Viral Video: हल्लीचे शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील धडे शिकवण्यापेक्षा शिक्षण अधिक मनोरंजक आणि कृतीशील करण्यावर भर देताना दिसतात. तंत्रज्ञानाचा वापर, विविध उपक्रम, खेळ आणि नवनवीन पद्धतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवादही अधिक मैत्रीपूर्ण झाला आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांची शिकवण्याची पद्धतही बदलत असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच इतर कौशल्ये विकसित करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे.
हल्ली शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसोबत अभ्यासाव्यतिरिक्त विविध उपक्रमांमध्येही सहभागी होताना दिसतात. काही शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मजेशीर रिल्स आणि डान्सचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करतात. अशा व्हिडीओंमधून शिक्षक-विद्यार्थ्यांमधील मैत्रीपूर्ण नाते आणि शाळेतील आनंदी वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे अशा रिल्सना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो.
सोशल मीडियावर सध्या अनेक हटके व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. यामध्ये लहान मुलांचे डान्स, तरुणांचे भन्नाट परफॉर्मन्स आणि शिक्षकांचे विद्यार्थ्यांसोबतचे मजेशीर क्षण नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. अशातच एका शिक्षकाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षक वर्गातील विद्यार्थिनींसोबत ‘चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. शिक्षकांना विद्यार्थिनींसोबत उत्साहाने नाचताना पाहून हा व्हिडीओ खास ठरत आहे. शाळेतील अभ्यासासोबतच अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आनंद व्यक्त करण्याची आणि आपली कला सादर करण्याची संधी मिळते. शिक्षक आणि विद्यार्थिनींच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mayur.lad777 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “छोट्या मुलीचा सिंगल डान्स रिल पुन्हा बनवा खूप छान डान्स करते ती… खूप लाईक मिळतील.”, एका युजरने लिहिलेय, “दोन चारदा पाहून कुणाचच मन भरणार इतक सुंदर बनवलं आहे सर. ती मधली छकुली तर भाव खाऊन गेली” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स सर व मुली”
