teacher dance with students viral video : काळानुसार बदलणे गरजेचे असते. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतींमध्येही बदल झाले आहेत. शिक्षक मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार मुलांना शिकवताना दिसत आहेत. गाणी म्हणून, प्रात्यक्षिक दाखवून अभ्यास तर कधी शाळा, कॉलेजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबर डान्स करतानाही दिसतात. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यांबरोबर केलेला जबरदस्त डान्स व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यावरून तुमची नजर हटणार नाही.

सोशल मिडियामुळे अनेक कला आपल्यासमोर येतात. तर आज एका शिक्षिकेची कला व्हायरल होते आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेला फालतू (F.A.L.T.U.) या चित्रपटातील ‘आल्टू जलालतू आई बला को टाल तू’ हे गाणं तुम्ही अनेकदा ऐकलंच असेल. तर या धम्माल गाण्यावर डान्स शिकवणारी शिक्षिका विद्यार्थ्यांचा सराव घेताना दिसत आहे. पिवळी साडी नेसून शिक्षिका विद्यार्थीनींबरोबर या गाण्यावर जबरदस्त स्टेप्स करताना दिसली आहे. विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यातील ताल, त्यांच्या स्टेप्स अगदी बघण्याजोग्या आहेत.

शिक्षिकेचा डान्स पाहून सगळेच थक्क (viral video )

डान्स करणे ही एक कला आहे. अनेक जण कलेकडे आवड म्हणून पाहतात. पण, कला सुद्धा करिअर घडू शकते. याचा विचार फार क्वचित लोक करतात. शिक्षिकेचा डान्स पाहून देखील तुम्हालाही त्यांच्यामध्ये डान्स करण्याची अद्भुक्त कला आहे याचा अंदाज येईल आणि तुम्ही तिच्या डान्सचे कौतुक कराल एवढं नक्कीच. अनेक व्हिडीओमार्फत शिक्षकांचं आयुष्य कसं असतं, दिवसभर मुलांना कसं सांभाळतात याबद्दल माहिती देत असते. एकदा बघाच शिक्षिकेचा विद्यार्थिनींबरोबर जबरदस्त डान्स…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @hey_miss_khushi_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “दररोज नवीन ऊर्जा, नवीन उत्साह, नवीन विचारांसह काहीतरी शिकवणे हे खूप छान आणि प्रेरणादायी काम आहे”, “जबरदस्त डान्स बघून खूप मजा आली”, “मस्त सराव सुरु आहे”, “शिक्षिकेमध्ये काय ऊर्जा आहे” ; आदी अनेकविध कमेंट्समध्ये नेटकरी शिक्षिकेच्या डान्स कौशल्यांची प्रशंसा करताना दिसून आले आहेत…