Viral Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे मनोरंजन, माहिती आणि संवादाचे प्रभावी माध्यम बनले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवर दररोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यापैकी काही व्हिडीओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचतात आणि “व्हायरल” होतात. नृत्य, गाणे, विनोदी प्रसंग, प्राण्यांचे व्हिडीओ, शैक्षणिक माहिती किंवा प्रेरणादायी कथा अशा विविध प्रकारच्या सामग्रीला प्रेक्षकांची पसंती मिळते.

हल्ली शाळांमध्ये केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये खेळीमेळीचे, आनंदी आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यावरही भर दिला जात आहे. वर्गातील वातावरण अधिक मोकळे आणि उत्साही राहिल्यास मुलांना शिक्षकांशी संवाद साधणे, प्रश्न विचारणे आणि आपल्या भावना व्यक्त करणे सहज शक्य होते. त्यामुळे अनेक शिक्षक शिकवतानाच विद्यार्थ्यांशी गप्पा मारणे, मजेशीर किस्से सांगणे, विविध उपक्रम घेणे तसेच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे अशा पद्धतींचा वापर करतात. अशा प्रसंगांमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते अधिक घट्ट होते. त्यामुळे अभ्यासासोबतच शाळेतील वातावरणही मुलांसाठी आनंददायी आणि आठवणीत राहणारे बनते.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे सध्या विविध भाषांमधील गाणी मोठ्या प्रमाणात चर्चेत येताना दिसतात. एखादं गाणं लोकप्रिय झालं की त्यावर अनेकजण डान्स, अभिनय किंवा आपल्या हटके अंदाजातील रिल्स तयार करून सोशल मीडियावर शेअर करतात. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, पंजाबी, दक्षिण भारतीय भाषांपासून ते परदेशी भाषांमधील गाण्यांवरही नेटकरी उत्स्फूर्तपणे रिल्स बनवताना दिसतात. त्यामुळे काही गाणी क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यातील स्टेप्स, हावभाव किंवा हटके अंदाजाचीही जोरदार चर्चा सुरू होते.

आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ चक्क शाळेतील असून, यात शिक्षक विद्यार्थ्यांसोबत सध्या ट्रेंडिंग असलेल्या गाण्यावर रिल बनवताना दिसत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा मजेशीर अंदाज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून, दोघांमधील खेळीमेळीचे वातावरणही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांसोबत अशा आनंदी क्षणांचा अनुभव घेताना शिक्षक दिसल्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका वर्गामध्ये शिक्षक चक्क आपल्या विद्यार्थ्यांसोबत ‘फिरी फिरी नाच’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. शिक्षकांचा उत्साही अंदाज पाहून विद्यार्थीदेखील त्यांच्यासोबत ताल धरताना दिसतात. वर्गातील हे मजेशीर आणि खेळीमेळीचे वातावरण कॅमेऱ्यात कैद झाले असून, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा अनोखा अंदाज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांसोबत असे आनंदाचे क्षण शेअर करणाऱ्या शिक्षकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by sumit (@tayde.sumit)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @tayde.sumit या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “आमच्या वेळस कुठे होते असेल शिक्षक” आणखी एकाने लिहिलेय, “आमचे सर आणि मॅडम तर कुत्रासारखे मारायचे पोरांना” आणखी एकाने लिहिलेय, “सगळ्यात मस्त व्हिडीओ ”