Teacher organised Ramp Walk For Students Viral Video : शाळा म्हटले की, शिकविणे आणि शिकणे एवढे दोनच शब्द आपल्याला आठवतात. पण, मुलांमध्ये आत्मविश्वास, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या शाळांमध्ये अगदी विविध खेळांपासून ते अगदी डान्स करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये चक्क चिमुकल्यांसाठी शिक्षिकेने रॅम्प वॉकचे आयोजन केलं आहे.

शिक्षिकेने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या रॅम्प वॉकमध्ये कोणताही सेलिब्रिटी किंवा कोणी मॉडेल नाही. तसेच कोणी कोणतेही फॅन्सी कपडे सुद्धा घातले नाहीत. तर वर्गातील काही विद्यार्थी गणवेशात हा रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. @the_casual_indian या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शिक्षिकेने आज विद्यार्थ्यांना भन्नाट सरप्राईज दिले आहे. विद्यार्थी दोन्ही बाकांमध्ये असणाऱ्या जागेत एकेक करून रॅम्प वॉक करत चालत येतात. त्याचदरम्यान रॅम्प वॉक करताना वर्गातील इतर वर्गमित्र त्यांच्यासाठी जोरजोरात टाळ्या तर काही जण डान्स करून त्यांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत.

ही शिक्षिका विद्यार्थ्यांना आयुष्यभर लक्षात राहील (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, कोणी अगदी केस उडवत, तर कोणी मजेशीर हावभाव देत तर अनेक जण डोक्यावर रुमाल बांधून, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये चालत येतात. एकेक विद्यार्थ्यांचे हावभाव, त्यांची स्टाईल पाहून इतर विद्यार्थी सुद्धा जोरजोरात हसताना दिसत आहेत; जे पाहून तुम्हाला शाळेची आठवण नक्कीच येईल. हा खेळ काही सेकेंदाचा असला तरीही आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण या विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षिकेने कायमची कोरली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा बघाच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ एकदा बघाच…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @the_casual_indian या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहा. प्रेमाने शिकवलेलं दृश्य असेच काहीसे दिसते” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. !नेटकरी हा व्हिडीओ पाहून “शाळेचे दिवस आठवंले”, “शिक्षिका बेस्ट आहे”, ” मला सुद्धा परत शाळेत प्रवेश घ्यायचा आहे”, “ही शिक्षिका विद्यार्थ्यांना आयुष्यभर लक्षात राहील” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.