Viral Video Teacher Sing Song With Students : छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव जरी ऐकलं तरी अंगावर शहारे येतात. मराठा साम्राज्य, किल्ले महाराजांनी आपल्याला दिलेली लाखमोलाची देणगी आहे. त्यामुळे हा गड किल्ले पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक असतात. पण, हे गड किल्ले आपण स्वच्छ राखतोय का? नाही ना… तर इतर कोणालाही दोष देण्यापेक्षा सुरुवात आपल्याकडूनच करायला हवी नाही का? स्वतः कचरा न टाकणे आणि इतरांनाही रोखणे. हीच खरी शिवप्रेमाची खरी ओळख आहे, जी आपण पिढ्यानपिढ्या जपली पाहिजे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये शिक्षिका विद्यार्थिनींना गड-किल्ल्यांची स्वच्छतेचे महत्व गाण्याद्वारे शिकवताना दिसते आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पहिली भेट ही इयत्ता ४ थी च्या पुस्तकातून झाली होती. पण, आताच्या पिढीला गोष्टी, पुस्तक, युट्युब चॅनेल, सिनेमा, गाण्यांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेणे सोपे जात आहे. आजचा व्हायरल व्हिडीओ शिवजयंती निमित्त पोस्ट करण्यात आला होता, जो सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. एका शिक्षिकेने वर्गात विद्यार्थिनींकडून गाणं म्हणण्याचा सराव आणि या गाण्याचा अर्थ समजावून सांगितलेला असतो.
“हीच पुढची पिढी इतिहाससुद्धा जपेल” (Viral Video)
वन, टू, थ्री म्हणताच शिक्षिका आणि विद्यार्थिनी “घडू दे नवी ही कथा आता राजा रचू दे नवा इतिहास तुझ्या गडांची ही व्यथा आता राजा कळू दे साऱ्या जगास…” हे गाणं म्हणण्यास सुरुवात करतात. कॅप्शननुसार हे गाणं म्हणून घ्यायचा फक्त एकच उद्देश आहे तो म्हणजे, पुढची पिढी फक्त गड पाहणारी नको. तर गड जपणारी हवी! शिवरायांचा वारसा म्हणजे गड-किल्ल्यांची स्वच्छता आणि स्वाभिमानाची शिकवण. तो पुढच्या पिढीत रुजवणं हीच खरी शिवजयंती आहे. एकदा बघाच शिक्षिका आणि विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sakshiiii_kale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून प्रत्येक युजर अगदी कौतुकाने कमेंट करत “हीच पुढची पिढी इतिहाससुद्धा जपेल आणि महाराजांच्या विचारांवर सुद्धा चालेल”, “डिजेच्या धांगडधिंग्यापेक्षा हे ऐकायला फार छान वाटतंय”, “शिवरायांसी आठवावे । जिवीत तृणवत्त मानावे”, “अंगावर शहारे आले! खूप सुंदर, भारत चांगल्या हातात आहे”, “आवाज खूप सुंदर ताई. अभिमान वाटतो अशा शिक्षकांचा” ; आदी अनेकविध कमेंट्स करताना दिसून आले आहेत.
