Viral Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे मनोरंजन, माहिती आणि संवादाचे प्रभावी माध्यम बनले आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवर दररोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यापैकी काही व्हिडीओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचतात आणि “व्हायरल” होतात. नृत्य, गाणे, विनोदी प्रसंग, प्राण्यांचे व्हिडीओ, शैक्षणिक माहिती किंवा प्रेरणादायी कथा अशा विविध प्रकारच्या सामग्रीला प्रेक्षकांची पसंती मिळते.
हल्लीचे शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील धडे शिकवण्यापेक्षा शिक्षण अधिक मनोरंजक आणि कृतीशील करण्यावर भर देताना दिसतात. तंत्रज्ञानाचा वापर, विविध उपक्रम, खेळ आणि नवनवीन पद्धतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवादही अधिक मैत्रीपूर्ण झाला आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांची शिकवण्याची पद्धतही बदलत असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच इतर कौशल्ये विकसित करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे.
हल्ली शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसोबत अभ्यासाव्यतिरिक्त विविध उपक्रमांमध्येही सहभागी होताना दिसतात. काही शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मजेशीर रिल्स आणि डान्सचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करतात. अशा व्हिडीओंमधून शिक्षक-विद्यार्थ्यांमधील मैत्रीपूर्ण नाते आणि शाळेतील आनंदी वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे अशा रिल्सना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो.
या व्हिडीओमध्ये एक शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थिनींसोबत ‘तम्मा तम्मा लोगे’ या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. शिक्षकांचा उत्साह पाहून विद्यार्थिनीही आनंदाने डान्स करताना दिसतात. वर्गातील या धमाल क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील मैत्रीपूर्ण नातं दाखवणारा हा व्हिडीओ अनेकांना आवडू शकतो.
शिक्षकाचा विद्यार्थिनींसोबतचा हा डान्स पाहून नेटकरी त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत. शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांसोबत असे आनंदाचे क्षण घालवणं, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणं आणि शाळेतील वातावरण आनंदी ठेवणं अनेकांना आवडत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dance_guru_krishna या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर, क्या बात है” एका युजरने लिहिलेय, “वा वा सर काय नाचलात” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी”
