एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यामागची जिद्दचं ती गोष्ट मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावते. असंख्य अडचणींचा सामना करत जिद्द आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी काहीजण शक्य करून दाखवतात. अशी बरीच उदाहरणं आपण सोशल मीडियावर पाहतोच. या उदाहरणांमधून सर्वांना प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमधील मुलीची जिद्द पाहुन तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

हा व्हायरल व्हिडीओ एका हर्डल रेसचा आहे. या शर्यतीच्या सुरूवातीलाच एक मुलगी तेथील हर्डलमध्ये अडकून पडते. इतर स्पर्धक तोपर्यंत पुढे निघुन जातात. अडखळल्यानंतर तिथेच न थांबता किंवा खेळ न सोडता ती पुन्हा स्पर्धेत भाग घेते आणि चक्क पहिला क्रमांक पटकावते. स्पर्धेच्या सुरूवातीलाच अडखळलेल्या तिने स्पर्धा जिंकुन दाखवत नेटकऱ्यांना आवाक केले आहे.

आणखी वाचा : Iphone 14 लाँच होताच ट्विटरवर झाला मिम्सचा वर्षाव; Viral Memes एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

हा व्हिडीओ ‘गुड न्युज मोमेंट’ या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आत्तापर्यंत ७ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अडचणींचा सामना करत आत्मविश्वासाने यश मिळवण्याची ही जिद्द नेटकऱ्यांना भावली आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत या मुलीचे कौतुक केले आहे. काहीवेळा अपयश आल्यानंतर प्रयत्न थांबणाऱ्या प्रत्येकासाठी हा व्हिडीओ प्रेरणादायी आहे.

आणखी वाचा : SBI चा कर्मचारी थेट ‘राजा महाबली’च्या वेषात पोहोचला बँकेत, नेटकरीदेखील अवाक, व्हायरल व्हिडीओची चर्चा

यूएसए टुडेने व्हिडिओमधील मुलीची ओळख सांगितली आहे. या मुलीचे नाव ॲबी डेनिस असुन ही युनायटेड स्टेट्समधील न्यू जर्सी येथील ओल्ड टप्पन हायस्कूलमधील विद्यार्थिनी आहे. तिने मे महिन्यात बर्गन काउंटी चॅम्पियनशिपमध्य १०० मीटर हर्डल रेस जिंकली होती.