scorecardresearch

“भाऊ, मला पाच किलो पीठ दे…” असं रडत रडत म्हणाला आणि एका रात्रीत नशीब पालटलं, पाहा हा VIRAL VIDEO

बाजारात आणि रस्त्याच्या कडेला मुलांना भीक मागताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या मुलाने लोकांना असं आवाहन केलं की, सगळेच अवाक् झाले.

(Photo: Instagram/ deepak_mahipal_mavi2112)

बाजारात आणि रस्त्याच्या कडेला मुलांना भीक मागताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. या मुलाने लोकांना असं आवाहन केलं की, सगळेच अवाक् झाले. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हे मुलगा सुरुवातीला लोकांना सांगत आहे की “भाऊ, पाच किलो पीठ द्या, भाऊ, माझी आई आजारी आहे. मी अशी व्यक्ती नाही. तुम्हाला व्हिडीओ लाईक करायच असेल तर करा.” या मुलाची ही स्टाइल पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले असून या मुलाचे कौतुक करण्यात येत आहेत.

खरं तर, सोशल मीडियावर असे व्हिडीओ दररोज व्हायरल होतात, जे युजर्सना गुदगुल्या करतात आणि कधीकधी त्यांना आश्चर्यचकित करतात. या मुलानेही असंच काहीसं केलं आहे. खरं तर बालमजुरी आणि भीक मागणे ही वाईट प्रथा भारतात अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले.

आणखी वाचा : जैसे कर्म तैसे फळ..! गाडी वेगाने पळवण्यासाठी म्हशीला चाबकाने मारत होता आणि…पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Kala Angoor : ‘कच्चा बादाम’ पाठोपाठ आता ‘काला अंगूर’ गाणं होतंय VIRAL

अलीकडेच, दिल्ली सरकारने एक स्तुत्य पुढाकार घेऊन दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने भीक मागणे आणि इतर चुकीच्या कामांमध्ये गुंतलेल्या मुलांना या तावडीतून बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. दिल्लीतील सीलमपूर भागात अनेक मुलांचे समुपदेशन करण्यात आले.

बालमजुरी आणि भीक मागणे ही भारतातील एक गंभीर समस्या आहे. या संकटातून निरपराध बालकांना बाहेर काढण्यासाठी शासन व अनेक निमसरकारी संस्थांनी विविध प्रयत्न केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video the boy said while crying give me 5 kg of flour then suddenly his attitude changed prp

ताज्या बातम्या