Viral Video: लग्नसराईच्या दिवसांत लग्नातील अनेक मजेशीर किस्से, फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात आपल्याला लग्नातील अनोख्या प्रथा, उखाणे, गमतीजमती, तर कधी भांडणदेखील पाहायला मिळतं. असे एकापेक्षा एक भावनिक, गमतीशीर, तऱ्हेवाईक व्हिडीओ आपण आतापर्यंत पाहिले असतील. दरम्यान, आता पुन्हा एकदा असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यात वधूने वराच्या कानाखाली मारल्याचे दिसत आहे.

लग्नातील प्रत्येक प्रथा वधू-वरासाठी खूप खास आणि त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनाच्या आठवणींत राहणारी असते. त्यातील काही प्रथांमध्ये वर आणि वधूमध्ये भांडणदेखील पाहायला मिळते. लग्नात नवऱ्याचा बूट चोरताना किंवा हार घालतेवेळी नेहमीच वधू-वराची भावंडे आणि मित्र-मैत्रिणींकडून गोंधळ केला जातो. या प्रकारचे मजेशीर चेष्टेचे वातावरण हल्ली अनेक लग्नांत पाहायला मिळते. अनेकदा या गोंधळामुळे लग्न लावणारे गुरुजीदेखील वैतागतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर आपल्या नववधूला सर्वांसमोर जबरदस्तीने लाडू भरविताना दिसत आहे. पण, वधूला त्याच्या या कृतीचा खूप राग येतो आणि ती सरळ त्याच्या कानशिलात दोन-तीन लगावते. पत्नीने कानाखाली मारल्याने वरासह त्यांच्या आजूबाजूचे लोकही घाबरतात आणि दोघांकडे पाहतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official___vishal_01 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तो शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, ‘लग्नात गोंधळ झाला’, असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत सात लाखांहून अधिक व्ह्युज आणि आठ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

हेही वाचा: ‘श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी’; डिलिव्हरीदरम्यान महिलेनं गायलं श्रीकृष्णाचे भजन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या प्रेमाची कधीही तुलना…”

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओवर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “हे लग्न फार काळ टिकू शकत नाही.” तर आणखी एकाने लिहिलेय, “लग्न करून भावाने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे.” तर आणखी एकाने लिहिलेय, “काही मुली लग्न झाल्यावर सासरी तमाशा करतात. हिने तर इथूनच सुरुवात केली.” तर आणखी एकाने लिहिलेय, “अरे देवा, हे काय आहे?”