Viral Video: लग्नाचा दिवस प्रत्येक वधू-वरासाठी खूप खास असला तरी या दिवशी अनेक गोष्टी मॅनेज करणं खूप कठीण असतं. आपला खास दिवस आयुष्यभर स्मरणात राहावा यासाठी वधू आणि वर कपडे, दागिने, मेकअप यासह डान्स, फोटोशूट सगळं काही परफेक्ट होईल याची खूप काळजी घेतात. शिवाय लग्नात आलेल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे, नातेवाईक यांचीदेखील विचारपूस करतात, त्यामुळे हा खास वाटणारा दिवस अधिकच कष्टदायी होऊन जातो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एक नवरी कुठल्यातरी गडबडीत दिसत आहे; पण पुढे असं काही होतं जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील विविध रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात.

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रिसेप्शनसाठी वधू आणि वर स्टेजवर फोटो काढण्यासाठी उभे असून यावेळी वधू कोणाला काहीतरी सांगताना दिसत आहे. ती बराच वेळ बडबड करताना दिसतेय. यावेळी तिच्यामुळे नवरदेव आणि आसपासचे लोक फोटो काढण्यासाठी थांबले आहेत. यावेळी वर तिला थांबायला सांगतो आणि तिचे तोंड फोटो काढण्यासाठी वळवतो. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ ट्विटरवरील @classicweddingvibes या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये, “शांत राहा जरा, फोटोशूटवर लक्ष दे’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास सात मिलियनहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the bride is talking with friends at wedding funny video sap