Viral Video: नवरी घोडीवरून नवरदेवाच्या घरी पोहोचली; केला जबरदस्त डान्स

व्हिडीओमध्ये नवरदेव नाही तर चक्क नवरी घोडीवरून वराच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर जबरदस्त डान्स करून तिने लोकांची मने जिंकली.

marriage funny video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: ANI)

सध्या लग्नसराईचा सीजन सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नासंदर्भात अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर होत आहेत. काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की ते लोकांना हसवतात. तर काही व्हिडीओ पाहून लोकांचे धक्का बसतो डोळे. त्याच वेळी, काही व्हिडीओवर विश्वासही ठेवणे कठीण होते. असाच एक बिहारमधील लग्नाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नाही तर चक्क नवरी घोडीवरून वराच्या घरी पोहोचली आणि त्यानंतर जबरदस्त डान्स करून तिने लोकांची मने जिंकली.

नक्की काय झालं?

प्रत्येक नवरा-नवरी आपल्या लग्नाला खास बनवू इच्छित असतात. यासाठी ते अनेकदा अशा काही गोष्टी करतात की बाकी लोक बघतच बसतात. अशातच आता गया शहरातील एक लग्न चर्चेचा विषय बनलं आहे. यामध्ये एक नवरी आपल्या नवरदेवाला घेण्यासाठी घोडीवर बसून येते. सांगितलं जात आहे की ही नवरी एक इअर होस्टेस अनुष्पा गुहाच लग्न पश्चिम बंगालच्या कोलकत्ताला राहणाऱ्या जीत मुखर्जीसोबत झालं. हे लग्न भव्य बनवण्यासाठी खूप तयारी केली गेली पण नवरीने जे केलं त्याची कोणी कल्पनाही केली न्हवती.

( हे ही वाचा: नवरदेवाच्या संतापलेल्या भावाने विवाह सोहळ्यात वहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद )

(हे ही वाचा: माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज! ट्रॅफिकमधील ‘शिवप्रेमी’ची ती कृती पाहून तुम्हीही कराल त्याला मानाचा मुजरा…)

नवरीचा जबरदस्त अंदाज

चांदचौरा येथील सुजुआर भवनातून वराला आणण्यासाठी घोड्यावर बसून वऱ्हाडी निघाले. नववधूची स्टाईल पाहून अनेकांनी तिच कौतुक केलं. आता लोक हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्याचवेळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून लोक व्हिडीओवर जोरदार चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video the bride reached grooms house on horseback did tremendous dance ttg

Next Story
कॉपी करण्याच्या नादात थेट चिखलाच्या डबक्यात कोसळली मुलगी..; VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल
फोटो गॅलरी