बुलडोझरचं मुख्य काम म्हणजे खोदकामात किंवा एखादे बांधकाम पाडणे. याच्याशी संबंधित अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. मात्र याच कामामुळे सध्या देशभरात एका बुलडोझरची चर्चा होतेय. अनेक बांधकामे उध्वस्त करणारा एक बुलडोझर स्वतःच जमीनदोस्त झाला आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये आपण एक बुलडोझर नदीवरील पूल तोडत असताना आपण पाहू शकतो. मात्र अचानक असे काहीतरी होते की तो बुलडोझरच नदीच्या पाण्यात पडतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी थक्क झाले आहेत.

व्हिडीओमध्ये दिसणारा हा बुलडोझर एका नदीवरील पूल तोडण्याचा प्रयत्न करत आहे. पुलाच्या तुटत आलेल्या भागावर दोन तीन वेळा घाव मारतो. यानंतर बघता बघता संपूर्ण पूल तुटून पाण्यात पडतो. याचा परिणाम बुलडोझरवरही होतो आणि तोही पाण्यात पडतो. या बुलडोझरमध्ये नेमके कितीजण बसले होते ते अद्याप समजलेलं नाही. ही घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली असल्याचं समजतंय. तुम्ही अनेक बुलडोझर इमारती पाडताना पाहिले असतील, पण पूल तोडण्याच्या प्रक्रियेत बुलडोझरच अपघाताला बळी पडल्याचे क्वचितच घडते.

जेवणासाठी आधार कार्ड दाखवा; वधूपित्याची वराच्या पाहुण्यांकडे अचंबित करणारी मागणी

हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरलभयानी या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओबरोबर ‘उत्तरप्रदेशात पूल तोडताना बुलडोझर नदीत पडला’ असे कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत १ दशलक्षाहून अधिक म्हणजेच १० लाख वेळा पाहिला गेला आहे, तर ६० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईकदेखील केले आहे.

त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने ‘ड्रायव्हरला काय झाले’ असे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूजरने ‘आशा आहे की ड्रायव्हर सुरक्षित आहे’ असे लिहिले आहे.