Viral Video: अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असणारे मानवी जीवन मांजर, कुत्रा, कासव, मासे आदी प्राण्यांना घरात निवारा देऊ लागले आणि माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशी नव्हे तर प्राण्यांशीसुद्धा नातेसंबंध जोडत जाऊ लागला. घरात पाळीव प्राणी असो किंवा रस्त्यावरील एखादा भटका श्वान किंवा मांजर अनेक जण त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. काही जण प्राण्यांना इतके घाबरतात तर काही जण प्राण्यांवर जीव ओवाळून टाकतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत दोन व्यक्ती मांजरांना दुचाकीवरून फिरवताना दिसत आहे. पण, व्हिडीओतील मांजरीची दुचाकीवर बसण्याची स्टाईल पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल.

अनेकदा रस्त्याकडेला पार्क केलेल्या दुचाकीवर मांजर झोपतात पण, आज व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्यावर फिरणाऱ्या मांजरींना दुचाकीवरून फेर-फटका मारायला घेऊन जाताना दिसत आहे. सगळ्यात पहिला एक व्यक्ती मांजरीला बसवते आणि दुचाकीवरून घेऊन जाते. पण, जेव्हा दुसरी व्यक्ती एका मांजरीला दुचाकीवर बसवते तेव्हा ती अगदीच माणसांप्रमाणे व्यक्तीच्या पाठीवर पाय ठेवून, सपोर्ट घेऊन बसताना दिसते जे पाहून तुम्ही थक्क होऊन जाल आणि पोटधरून हसाल. माणसांप्रमाणे दुचाकीवर बसणाऱ्या मांजरीचा व्हिडीओ तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…व्हिजिटिंग कार्ड नव्हे पर्यावरणाचे संरक्षण! आयएएस अधिकाऱ्यांची ‘ही’ कल्पना पाहून तुम्हीही व्हाल थक्क…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एक मांजर रस्त्याकडेला उभी असते. तेव्हा एक व्यक्ती दुचाकी घेऊन मांजरीसमोर उभी राहते. मांजर चटकन उडी मारून दुचाकीवर बसते खरी पण, नंतर ती अगदी माणसांप्रमाणे व्यक्तीच्या पाठीवर तिचे दोन्ही पाय ठेवते. बहुधा दुचाकी चालू झाल्यावर ती पडणार नाही या भीतीने की काय ती माणसांप्रमाणे त्याला अगदीच पकडून बसते ; जे पाहून तुम्हालाही नवल वाटेल.

प्राणी देखील माणसांना बघून त्यांचे अनुकरण करताना दिसतात. तसंच काहीस या मांजरीने सुद्धा केलं आहे. व्यक्तीच्या दुचाकीवर माणसांप्रमाणे बसताना दिसून आली आहे ; जे अगदीच कौतुकास्पद व हास्यास्पद आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Cat__twist या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण मांजरीची दुचाकीवर बसण्याची पद्धत पाहून मजेशीर कमेंट करताना दिसून आले आहेत.