सोशल मीडियावर दररोज नवनवे व्हिडीओ शेअर होत असतात. अनेकदा लहान मुलांचे क्यूट व्हिडीओंचा जणू खजिनाच असतो. असे व्हिडीओ काही क्षणातच व्हायरल होत असतात. लहान मुलांचे हे क्यूट एक्सप्रेशन्स पाहून तुम्हाला देखील हसू आवरत नसेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओमधल्या चिमुकल्याचे एक्सप्रेशन्स पाहून क्यूट हा एकच शब्द तुमच्या तोंडून निघेल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला एका खुर्चीवर बसलेला दिसून येतोय. खुर्चीवर बसून हा चिमुकला खेळण्यात गुंतलेला दिसून येतोय. खेळता खेळता अचानक या मुलाने आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे एक्सप्रेशन्स देऊ लागला. हे एक्सप्रेशन्स पाहून तुम्ही सुद्धा या चिमुकल्याच्या प्रेमात पडाल. हा चिमुकला आपले डोळे कधी मिचकवतोय तर कधी डोळे फिरवत चिडवताना दिसून येतोय. कधी चेहरा विचित्र करत खेळताना दिसून येतोय. स्वतःच्या चेहऱ्यावरचे हे चित्र-विचित्र एक्सप्रेशन्स देऊन त्याला स्वतःला सुद्धा हसू आवरत नाही. असं तो दोन वेळा करतो.

आणखी वाचा : चक्क विमानांमध्ये अगदी लोकलसारखीच हाणामारी, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच…

या व्हायरल व्हिडीओमधल्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसून येतोय. या लहानग्याचा एक्स्प्रेशन्सचा खेळ पाहून लोक सुद्धा पोट धरून हसू लागले आहेत. सध्या हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. hepgul5 नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक कमेंट सेक्शनमध्ये त्याच्यावर प्रेमाचा वर्षावर करताना दिसून येत आहे. अनेकांनी या चिमुकल्याच्या अभिनय कौशल्याचं कौतूक केलंय.

आणखी वाचा : नाद खुळा…शेतकऱ्याने बनवला पेट्रोल-डिझेलशिवाय चालणारा ट्रॅक्टर, मायलेज पाहून व्हाल थक्क

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ट्रकवर ठेवलेला हा विशालकाय टायर तुम्ही हैराण व्हाल! पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओचा आनंद घेताना दिसून येत आहेत.