Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. सोशल मीडियावरील रिल्स, डान्स, गाणी अशा विविध गोष्टींमुळे आपले मनोरंजन होते. मात्र, अनेकदा यावर काही धक्कादायक व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा अपघात, मारहाण अशा दुर्घटनांचाही समावेश असतो. या घटना कधी माणसांसोबत, तर कधी प्राण्यांसोबतही होतात. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कुत्र्याला चिडवताना दिसत आहे. पण, पुढे असं काहीतरी होतं जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

कुत्र्याला प्रामाणिक प्राणी म्हटलं जातं, त्यामुळे तो अनेकांचा आवडता प्राणी आहे. अनेक घरांमध्ये कुत्र्याला घरातील सदस्यांइतकेच महत्व आणि प्रेम दिलं जातं. पण, समाजात काही लोक असेदेखील असतात, जे या पाळीव प्राण्यांना विनाकारण त्रास देतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्याला असंच चिडवताना दिसत आहे.

Who is Trishla Chaturvedi
“आमच्यासमोर नॉनव्हेज बिर्याणी ऑर्डर केली म्हणून ४५ दिवस गोमूत्र-शेण खाल्लं”, हा दावा करणाऱ्या त्रिशला चतुर्वेदी कोण आहेत?
Women Threatens Puppy For Breaking Charger Wire
चार्जरची वायर तोडली म्हणून मालकिणीने श्वानाच्या पिल्लाला धमकावले; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही खूप निर्दयी…”
a young guy merged toilet with a scooter jugaad video goes viral
तरुणाने स्कुटीला लावला चक्क कमोड, जुगाड पाहून तुम्हीही डोकं धराल; VIDEO होतोय व्हायरल
Man Wrote Message For His Wife In Back Of The Car Video Goes Viral
Photo: याला म्हणतात वडिलांचा धाक! तरुणानं गाडीच्या मागे लिहलं असं काही की पोट धरुन हसाल
Shani Sadesati when will mesh rashis shani sadesati will start people need to be careful
मेष राशीची साडेसाती नेमकी केव्हा सुरू होणार आहे? सावध राहण्याची गरज; जाणून घ्या, ज्योतिषशास्त्र काय सांगतात…
Women Foxcon
सौभाग्य जपून बेरोजगार व्हायचं की आधुनिक राहून काम करायचं? बायानों, काय पटतंय तुम्हाला?
The young man showed cleverness to escape from the stray dogs
याला म्हणतात डोकं! भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तरुणानं लढवली शक्कल; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Suryakanta patil on track after joining sharad pawar ncp group All eyes on her Upcoming maharashtra assembly election performance
सूर्यकांता पाटील यांची गाडी अखेर रुळावर आली

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक काळ्या रंगाचा कुत्रा एका दुकानाबाहेर उभा आहे. त्यावेळी तिथे बसलेला एक तरुण व्हिडीओमध्ये सांगतो की, मित्रांनो हा आमचा मित्र आहे, आम्ही याला काळू म्हणतो. त्यानंतर तो तरुण काळू…काळू म्हणत कुत्र्याला बराच वेळ चिडवतो. काळू म्हटल्यामुळे कुत्र्याला त्या तरुणाचा प्रचंड राग येतो आणि तो थेट त्या तरुणावर हल्ला करतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @Ghar Ke Kalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि पाच हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “त्याने तुम्हाला सावध केलंय, पण पुन्हा असं करू नका.” तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “भावा कुत्रा आहे तो, त्याच्यासोबत असं केलं तर चावणारच ना”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “तुम्ही त्याला त्रास दिल्यावर तोही तेच करणार”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “त्याला काळू नाही बोलायचं.”

हेही वाचा: ‘इस प्यार को क्या नाम दूं?’, कुत्रा आणि माकडाचं गच्चीवरचं प्रेम; VIDEO पाहून नेटकरी अवाक्; म्हणाले, “जोडी लाखात एक…”

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात काही लोक कुत्र्याला त्रास देताना दिसले होते. एका व्हिडीओमध्ये तर दोन टवाळ तरुणांनी एका कुत्र्याला ५० फुटांवरून खाली फेकले होते. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये एका महिलेने कुत्र्याच्या पिल्लांना कचऱ्याच्या डब्यात फेकले होते.