Viral Video: जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून वाघ, सिंह, बिबट्या यांना ओळखलं जातं. त्यांच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारख्या भयानक प्राण्यांना संगळेच घाबरतात. तुम्ही या प्राण्यांनी केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मात्र, आता असा व्हिडीओ समोर आलाय ज्यात एका कुत्र्याने सश्याची शिकार केल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये कुत्र्यांनी अवघ्या काही सेकंदात अक्षरश: सश्यावर हल्ला केला आहे.

जगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचावा असं वाटतं, त्यामुळे तोदेखील जिवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

समाजमाध्यमांवर अनेक व्हिडीओ आपल्या नजरेस पडत असतात, ज्यात काही प्राण्यांचेही व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक कुत्रा सश्याची शिकार करताना दिसतोय.

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, जंगलामध्ये शिकारीच्या शोधात असणाऱ्या कुत्र्याला एका बिळात ससे लपल्याची चाहूल लागते. यावेळी त्या बिळाबाहेर कुत्रा ठाण मांडून बसतो. इतक्यात ससा बाहेर येताच कुत्रा त्याला आपल्या तोंडात पडतो. यावेळी आणखी एक ससा त्या बिळातून बाहेर पडत होता. परंतु दुर्दैवाने आणखी एक कुत्रा त्या बिळाबाहेर उभा असल्याने तो दुसऱ्या सश्याचा पाठलाग करून त्याची देखील शिकार करतो. अशा प्रकारे दोन्ही कुत्रे दोन ससे घेऊन तिथून पळून जातात.

पाहा व्हिडीओ:

हा सगळा थरारक प्रकार एका व्हिडीओत रेकॉर्ड झाला आहे. सोशल मीडियावर @RabbitExpress नावाच्या युट्यूब अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.