Video : ‘हा’ कुत्रा झालाय स्केटिंग मास्टर; सोशल मीडियावर होतेय वाहवाह

ज्याप्रकारे हा कुत्रा कोणाच्याही मदतीशिवाय स्केटिंग करत आहे ते बघून आपण नक्कीच हैराण होऊ.

dog is skating
व्हिडीओमध्ये कुत्रा स्केटिंग बोर्ड घेऊन येतो, त्यानंतर तो ते बोर्ड बर्फावर ठेवतो आणि त्यावर बसून स्केटिंग करतो. (फोटो : सोशल मीडिया)

सोशल मीडियावर आपण अनेक सुंदर गोष्टी पाहत असतो. तर कधीकधी आपण अशा गोष्टी पाहतो की आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. आज आपण असा एक व्हिडीओ पाहणार आहोत, ज्यात एक कुत्रा बर्फावर स्केटिंग करताना दिसतोय. या व्हिडीओ सोशलने मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की कोणाच्याही मदतीशिवाय स्केटिंग करताना दिसतोय. हा कुत्रा आपल्या तोंडात ते स्केटिंग बोर्ड घेऊन येतो आणि त्यासोबत मस्ती करत आहे. हा व्हिडीओ अतिशय रोमांचक असून सोशल मीडिया वापरकर्त्यांना खूप आवडला आहे.

Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये कुत्रा स्केटिंग बोर्ड घेऊन येतो, त्यानंतर तो ते बोर्ड बर्फावर ठेवतो आणि त्यावर बसून स्केटिंग करतो. हा खेळ खेळताना कुत्रा फारच खुश दिसतोय. या व्हिडीओ आतापर्यंत ९० हजार पेक्षा जास्त वेळा बघितला गेला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचा साहसी पराक्रम पाहून तुमचाही उर अभिमानाने दाटून येईल

व्हिडीओ पाहिल्यानंतर असे वाटेल की या कुत्र्याला स्केटिंगची ट्रेनिंग देण्यात आली आहे. ज्याप्रकारे हा कुत्रा कोणाच्याही मदतीशिवाय स्केटिंग करत आहे ते बघून आपण नक्कीच हैराण होऊ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video the dog is skating without anyones help pvp