Viral Video: सोशल मीडियावर जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो, ज्यातील काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात; तर काही प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. अशा प्रकारचे व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडतो. तसेच कधी कधी आपल्यासमोर असे व्हिडीओ येतात की, ज्यातील घटनेची आपण कल्पनादेखील केलेली नसते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हत्ती हा जंगलातील असा प्राणी आहे की, ज्याला पाहिल्यावर लोक घाबरत नाहीत. कारण- हत्ती शांत आणि इतर प्राण्यांपेक्षा जास्त भावनिक प्राणी आहे. परंतु, जेव्हा हत्तीला राग येतो तेव्हा त्याचे रौद्र रूपही भीतीनं गाळण उडविणारे असते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात हत्तीचा राग पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका तळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या हत्तीला त्या तळ्यातील मगर मुद्दाम त्रास देते. त्या वेळी हत्तीची सहनशक्ती संपते आणि तो त्या मगरीला सरळ पायदळी तुडवून मारून टाकतो. सध्या हत्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: “पोरी, काय नाचतेस गं… “, ‘आज की रात मजा’ गाण्यावरील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच…

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @Latestsightings या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि २५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “मगरीला हत्तीच्या शक्तीचा अंदाज नव्हता वाटतं.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हत्ती कधी कसा वागेल सांगता येत नाही.” तर आणखी एकाने लिहिलेय, “मगरीची चूक आहे.”

Story img Loader