scorecardresearch

फ्लाइट अटेंडंटने रडणाऱ्या लहान मुलाला शांत केलं…बाळाचा गोंडस VIDEO VIRAL

सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही गहिवरून जाल. या व्हिडीओमध्ये फ्लाइट अटेंडंट एका रडणाऱ्या बाळाला शांत करताना दिसत आहे.

फ्लाइट अटेंडंटने रडणाऱ्या लहान मुलाला शांत केलं…बाळाचा गोंडस VIDEO VIRAL
(Photo: Instagram/ goodnews_movement)

Flight Attendant Crying Kid Viral Video : विमानाने प्रवास करणे काहींना खूपच कंटाळवाणं वाटत असतं. विशेषत: जेव्हा लहान मुलं सोबत असतात. पण विमानातले केबिन क्रू कोणत्याही समस्या सोडवण्यात तुमच्या मदतीला येत असतात. अशी अनेक उदाहरणे देणारे व्हिडीओज तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही गहिवरून जाल. या व्हिडीओमध्ये फ्लाइट अटेंडंट एका रडणाऱ्या बाळाला शांत करताना दिसत आहे.

ब्राझील येथून कुएबाला जाणाऱ्या फ्लाइट दरम्यान हा प्रसंग घडलाय. या व्हिडीओमधल्या फ्लाइट अटेंडंटने लाखो लोकांचे मन जिंकले आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गुड न्यूज मूव्हमेंटने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

आणखी वाचा : स्विमिंग पूलमध्ये बुडत होती आई, १० वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव, पाहा VIRAL VIDEO

छोट्या व्हिडीओमध्ये एअर होस्टेस मुलाला शांत करताना दिसत आहे. कॉरिडॉरमध्ये उभं राहून त्याने बाळाला मिठी मारली आहे. बाळ झोपावं म्हणून हा फ्लाइट अटेंडंट विमानात इकडून तिकडे फेरी मारत बाळाच्या पाठ थोपटताना दिसत आहे. या व्हिडीओमधलं बाळ सुद्धा फ्लाइट अटेंडंटच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत पडलेला दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शननुसार, त्याने मुलाला खेळण्यासाठी आधी स्टिकर्स आणि कप देखील दिले. पण त्याचे रडणे काही थांबत नव्हते. त्यानंतर फ्लाइट अटेंडंटने मुलाला कडेवर घेतलं.

आणखी वाचा : एका बाईकवर एक पुरूष, दोन महिला आणि चार मुली, एकूण सात जण बसले, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : हत्तीने बाप्पाच्या गळ्यात हार घालून केले स्वागत, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागला की आतापर्यंत या व्हिडीओला १.६ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नेटिझन्सनी फ्लाइट अटेंडंटच्या प्रेमळ हावभावाचं कौतुक केले. हा व्हिडीओ अप्रतिम असल्याचं देखील काहींनी म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video the flight attendant silenced the crying child like the boy wrapped by the air hostess prp

ताज्या बातम्या