Viral Video: प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात, ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडीओ तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. अनेकदा काही प्राणी पक्ष्यांवरही हल्ला करताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

प्राणी असो किंवा माणूस दोघांची आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. यासाठी ते आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच एक घटना जंगलामध्ये घडल्याचे दिसत आहे.

जंगलातील प्राणी, पक्ष्यांमध्ये स्वतःला सतत हिंस्त्र प्राण्यांपासून वाचवण्याची धडपड सुरू असते. या प्राण्यांना जंगलात मनसोक्त फिरावसं वाटलं तरी १० वेळा विचार करावा लागत असेल. अशीच वेळ अनेकदा जंगलात वावरणाऱ्या पक्ष्यांवरही येते. परंतु देवाने पक्ष्यांना पंख दिलेले आहे ज्यामुळे हवं तिथे हव्या तेवढ्या उंचीवर ते उडू शकतात. हेच पंख या पक्ष्यांसाठी वरदान ठरतात आणि शिकार होण्यापासून वाचवतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं जे पाहून तुम्हीही शॉक व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये एक पक्षी पाणी पित असून यावेळी एका कोल्ह्याची नजर त्याच्यावर जाते. पक्ष्यावर हल्ला करण्यासाठी कोल्हा वेगाने धावतो, पण पक्षी चतुर असल्याने लगेच आपले पंख पसरून उडू जातो. यावेळी त्या पक्ष्याचे फक्त एक पंख कोल्ह्याच्या तोंडात येते. पक्ष्याच्या तत्परतेमुळे तो आपला जीव वाचवतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @Samadand1 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “पक्ष्याला त्याच्या पंखांनी वाचवलं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “कोल्ह्याचा पोपट झाला रे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “पक्षी चतुर निघाला”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.”