Viral Video: “प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं”, आयुष्यात एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे ही खूप सुखद आणि सुंदर भावना आहे. त्याशिवाय आयुष्यातील पहिले प्रेम नेहमीच खास आणि न विसरणारे असते, असे म्हटले जाते. पण, अनेकदा अल्लड वयात काही तरुण-तरुणी भावनेच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. या संदर्भातील अनेक किस्से तुम्ही ऐकलेच असतील. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येही असेच काहीतरी पाहायला मिळत आहे; जे पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी वटपौर्णिमेचा सण पार पडला. महाराष्ट्रातील सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तोच पती सात जन्म मिळावा यासाठी आवर्जून करतात. ज्याप्रकारे महाराष्ट्रात पतीसाठी महिला वटपौर्णिमा साजरी करतात, त्याचप्रकारे उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील सुवासिनी महिला करवा चौथचे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. या दिवशी सर्व महिला लाल रंगाची साडी नेसतात. सध्या व्हायरल होत असलेली एक प्रेयसीदेखील करवा चौथचे व्रत करताना दिसत आहे.

बऱ्याचदा प्रेमात पडलेले तरुण-तरुणी लहान वयातच काय करतील हे सांगता येत नाही. मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका लहान मुलाने शाळेतील विद्यार्थिनीच्या भांगेत कुंकू भरले होते, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. आता याच प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक प्रेयसी आपल्या प्रियकरासाठी करवा चौथ साजरी करताना दिसत आहे. यावेळी तिने लाल रंगाची साडीदेखील नेसली होती. यावेळी तरुणीने प्रियकरला व्हिडीओ कॉल लावला असून एका खुर्चीवर मोबाइल ठेवून ती प्रियकराची पूजा करताना दिसत आहे. यावेळी तिने त्या खुर्चीभोवती दूधाचा अभिषेक केला, शिवाय तिने प्रियकरासमोर अगरबत्तीदेखील लावली. तरुणीचा हा बालिशपणा पाहून युजर्सही सोशल मीडियावर तिची प्रचंड खिल्ली उडवताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘मुझसे अब दूर ना जा…’ गाण्यावर आजींचा तरुणासोबत रोमँटिक डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “आजी आता जरा…”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathi_comedy_kattta या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर ८० हजारांहून अधिल लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “आता फक्त हार घालायचा बाकी राहिला आहे”, तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “जाऊ दे, मुलीचं खरंच प्रेम असेल”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “काय चाललंय आताच्या मुलींचं काही समजत नाही”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हिचा मोबाइल वॉटरप्रूफ आहे वाटतं.”