Viral Video: सिंह, वाघ किंवा बिबट्या या हिंस्र प्राण्यांचे नाव जरी घेतले तरी अनेकांना घाम फुटतो. फक्त माणसंच नाही तर जंगलातील इतर प्राणीदेखील या प्राण्यांपासून स्वतःचा जीव कसा वाचवता येईल यासाठी अनेक प्रयत्न करीत असतात. हे प्राणी आपल्या आसपासच्या परिसरात फिरत असल्याची माहिती जरी कळाली तरी अनेक जण घरातून बाहेर पडायला घाबरतात. पण, याच प्राण्यांना हौस म्हणून भेटण्यासाठी अभयारण्यांमध्ये अनेक लोक गर्दी करताना दिसून येतात. सध्या या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक सिंह एका व्यक्तीबरोबर असं काहीतरी करतो, जे पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.

हल्ली प्राण्यांचेदेखील अनेक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. त्यात बऱ्याचदा लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांबरोबरचे व्हिडीओदेखील शेअर करीत असतात. या व्हिडीओंमध्ये अनेकदा लोक आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांबरोबर खेळताना, तर कधी मजामस्ती, तर कधी भांडण करतानाही दिसतात. पण, तुम्ही कधी कोणत्या व्यक्तीला सिंहाबरोबर मस्ती करताना पाहिलंय का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक सिंह एका व्यक्तीबरोबर असं काहीतरी करतोय, जे पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका अभयारण्यामधील सिंहाजवळ एक व्यक्ती जाऊन उभी राहते. यावेळी तो सिंह त्या व्यक्तीचे तोंड त्याच्या जबड्यात पकडतो. सिंहाच्या या थरकाप उडवणाऱ्या कृतीने ती व्यक्ती घाबरून न जाता तिथेच शांतपणे उभी राहते. या व्हिडीओत पुढे नक्की काय घडले हे व्हिडीओत शूट करण्यात आलेलं नाही. पण, हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @enamul___hoqe अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत चाळीस हजारांहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘शेवटी कर्माचे फळ मिळतेच…’ श्वानाला स्टेजवरून फरपटत नेणाऱ्या व्यक्तीबरोबर झालं असं काही…; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कर्म चांगले ठेव..”

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप भयानक.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “काय झालं असेल पुढे नक्की.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “अरे, तो तुला खाऊन टाकेल.” इतर युजर्सही हा व्हिडीओ पाहून खूप घाबरल्याचे सांगत आहेत.

Story img Loader