Viral Video: समाज माध्यमांवर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात तर अनेकदा काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सिंहीण एका सिंहापासून तिच्या पिल्लांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
जगात आई एवढे प्रेम तिच्या मुलांवर कोणीही करत नाही. मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी, आई नेहमीच प्रत्येक गोष्टीत स्वतःआधी आपल्या लेकरांचा विचार करते. स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरते. आईच्या तिच्या मुलांवरच्या प्रेमाची एक नाही लाखो उदाहरण आहेत. ज्यातून मुलांबद्दलचे निस्वार्थ प्रेम दिसून येते. सध्या जंगालातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय ज्यात एक सिंहीण आपल्या जीवाची पर्वा न करता पिल्लांना वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, पिल्लांवर नजर ठेऊन असलेल्या सिंहाला सिंहीण पाहते आणि त्या पिल्लांचे त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी जंगलातील पिल्लांना झुडपांमध्ये लपवते. शिवाय यावेळी सिंहाला खुन्नस देऊन तिथून दूर निघून जाण्यासही भाग पाडते. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी एक आईच हे करू शकते. मग ती माणूस असो किंवा प्राणी, हे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहे.
हा व्हिडीओ युट्यूबवरील @Incredible Wild Lion Sightings या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाल्या असून यावर अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना देखील दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “शेवटी आईचे प्रेम खूप अनमोल आहे, याची तुलना कधीच कोणासोबत होऊ शकत नाही.”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “आईने करून दाखवलं”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “खूप छान”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हिच खरी आई”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “अशीच असते आईची माया”

