Little boy Viral Video: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओंमध्ये लहान मुलं नवनवीन रील्स बनवताना दिसतात, तर काही व्हिडीओ त्यांच्या नकळत काढण्यात आलेले असतात. यातील बरेच व्हिडीओ खूप चर्चेत येतात. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान लहान मुलांचे बाप्पाबरोबरचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. यातील काही व्हिडीओंमध्ये लहान मुलं बाप्पाचे विसर्जन झाल्याने रडताना दिसत होती. आताही एका लहान मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तो बाप्पासमोर असं काहीतरी म्हणत आहे, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

लहान मुलं खूप निरागस असतात, त्यामुळे लहानपणापासून घरामध्ये, शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होतो. बाप्पाचे घरी आगमन झाल्यानंतर अनेक घरांमध्ये मांसाहार केला जात नाही. या व्हिडीओतील चिमुकल्याने चिकन खाल्ले, ज्यामुळे घरातील मंडळी त्याला चिडवू लागली. त्यामुळे तो बाप्पासमोर जाऊन असं काहीतरी बोलतो, जे पाहून नेटकरी हसताना दिसत आहेत.

Mumbai: Video Of Last Man To Take Darshan Of Lalbaugcha Raja Goes Viral
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
EY toxic culture controversy ashneer grover
Ashneer Grover EY story: “एक कोटी पगार; तरीही पहिल्याच दिवशी पळालो” अशनीर ग्रोवरनं सांगितला EY कंपनीतील धक्कादायक अनुभव
Puneri Pati shows the bitter truth of Kali Yuga
“बाप्पा मी हात जोडायचे विसरलो…” या पुणेरी पाटीने दाखवलं कलियुगातील कटू सत्य; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘जुने दिवस..’
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
An innocent girl student danced in class while everyone closed their eyes
बालपण देगा देवा! वर्गात सुरु होती प्रार्थना अन् डोळे मिटून चिमुकली एकटीच नाचत होती, गोंडस Video एकदा पाहाच
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका चिमुकल्याने चिकन खाल्लं म्हणून घरातील मंडळी त्याला, तुला आज बाप्पाची आरती देणार नाही, असं म्हणून मुद्दाम चिडवतात. यावर तो चिमुकला मोठमोठ्याने रडू लागतो आणि जाऊन बाप्पासमोर, “बाप्पा सॉरी… चुकून चिकन खाल्लं” असं म्हणून बाप्पाची माफी मागतो. चिमुकल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: जगण्यासाठी शिकार महत्त्वाची! वाऱ्याच्या वेगाने आला सिंह अन् केला चित्यावर हल्ला; पुढच्या पाच सेकंदांत जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathihasyaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास एक मिलियनहून जास्त व्ह्यूज आणि पन्नास हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “किती निरागस आहे हा”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “अरेरे बिचारा”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “कशाला त्या लहानग्याच्या भावनांशी खेळता.”