Viral Video: सोशल मीडियामुळे सतत विविध गाणी व्हायरल होताना आपण पाहतो. त्यातील काही गाणी नवीन, तर काही जुनी गाणीदेखील असतात. रील्समुळे गाणी चर्चेत येण्याचे प्रमाण वाढले आहे. इतर भाषांतील गाण्यांप्रमाणेच मराठी गाण्यांचीही लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अगदी आताच्या गुलाबी साडी, बहरला मधुमास, आप्पाचा विषय हार्ड आणि तांबडी चामडी अशा अनेक नवीन गाण्यांनी लोकांना भुरळ घातली आहे. त्यावर मराठी युजर्ससह बॉलीवूडमधील कलाकार, परदेशांतील लोकही थिरकताना दिसतात. दरम्यान, आता मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या फुलवंती या मराठी चित्रपटातील ‘मदनमंजिरी’ गाणं खूप चर्चेत आहे. ज्यावर या व्हिडीओतील चिमुकली डान्स करताना दिसत आहे.

अनेक लहान मुलांना अभिनय, नृत्य या क्षेत्रांत आपलं नाव मोठं करायचं आहे. रील्समुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पूर्वी लहान मुलांना मोठेपणी तुम्ही काय होणार, हे विचारल्यावर मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलिस अशी उत्तरं द्यायची. पण, हल्लीची मुलं, अभिनेत्री किंवा रील्स स्टार, यूट्युबर व्हायचंय, असं सांगतात. सोशल मीडियावर लहान मुलांच्या अभिनयाचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

peeling song out now
Pushpa 2 : चित्रपटातील धमाकेदार गाणं प्रदर्शित, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा Peelings वर एनर्जेटीक डान्स
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Mumbai Local Train Viral Video
Mumbai Local Train : ‘भाऊ ट्रेन, टाईम आणि डब्बा सांग…’ ट्रेनमध्ये भजन गाणाऱ्या तरुणाला पाहून मुंबईकर झाले इम्प्रेस; पाहा व्हिडीओ
indian idol season 15 Chaitanya Devadhe mimicry of nana patekar watch video
Video: आळंदीचा चैतन्य देवढे गाजवतोय ‘इंडियन आयडल’चं १५वं पर्व, नाना पाटेकरांनी त्याची ‘ही’ कृती पाहून जोडले हात, पाहा व्हिडीओ
amitabh bachchan reaction after seeing vitthal murti
Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक
Bride push down the groom on stage over bride dont want to marry him video goes viral on social media
VIDEO: “अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” भर लग्नात स्टेजवरच नवरदेवासोबत नवरीनं काय केलं पाहा
pune video crowd at pune railway station
“निम्मं तरी पुणे रिकामे झाले” पुणे रेल्वे स्टेशनवर तुफान गर्दी, Video होतोय व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लहान मुलीने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली असून ती यावेळी ‘मदनमंजिरी’ या गाण्यावर लावणी करताना दिसतेय. तिच्या लावणीसह यावेळी तिच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्सही पाहण्यासारखे आहेत. चिमुकलीचा या लावणीवरील ठेका पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, नेटकरीही त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: आईशप्पथ, याला बोलतात डान्स…”, ‘मोरनी’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @star_dance_studio_04 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास ७० हजाराहून अधिक व्ह्युज आणि हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान करतेस.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप सुंदर बाळा अशीच प्रगती कर” आणखी एकाने लिहिलेय, “व्वा! खूपच सुंदर व्हिडीओ.”