The little girl dance: सोशल मीडियावर सतत विविध वयोगटांतील, विविध देशांतील, विविध भाषांचे अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ युजर्सना इतके आवडतात की, ज्यामुळे ते प्रचंड चर्चेत येतात. हल्लीच्या अनेक लहान मुलांमध्येही सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण आहे. नवनवीन गाणी, चित्रपट, त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा प्रकारच्या विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवितात. काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘आप्पांचा विषय हार्ड‘ यांसारखी अनेक मराठी गाणी खूप चर्चेत आहेत. त्यातलीच एक ‘पिचली माझी बांगडी‘ हे गाणंही खूप चर्चेत होतं. या गाण्यावर एका चिमुकलीनं जबरदस्त डान्स केलेला पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली तिच्या घरामध्ये ‘पिचली माझी बांगडी…‘ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. यावेळी त्या चिमुकलीच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत असून, नेटकरी त्यावर अनेक प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vedanti_the_dramebaaz या अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यावर आतापर्यंत तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दीड लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. हेही वाचा: या एका भाषणामुळे बिग बॉसमधील घनश्याम दरवडे झाला ‘छोटा पुढारी’, Video होतोय तुफान व्हायरल; नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष पाहा व्हिडीओ: https://www.instagram.com/reel/C5L2EXXNjK4/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== युजर्सच्या कमेंट्स चर्चेत एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, "काय गोड नाचतंय पिल्लू…", तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, "सुपर क्युट", तर आणखी एकानं लिहिलंय, "किती भारी राव", तर आणखी एकानं लिहिलंय, "चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स चांगले आहेत. खूप छान नाचलीस."