Viral Video: समाजमाध्यमांवरील ट्रेंड सतत विविध गोष्टींमुळे बदलत असतो. कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ सातत्याने आपल्या डोळ्यांसमोर येतात. बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एका चिमुकलीचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात तिने असं काहीतरी केलंय, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

लहान मुलं कधी काय करामत करतील हे कोणीच सांगू शकत नाही. आपण काय करतोय आणि हे केल्यानंतर पुढे काय होईल? याची कल्पना त्यांना नसते. त्यामुळेच अनेकदा नकळत ते अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होते. काही गोष्टी आपल्यापैकी अनेकांबरोबर घडल्या असतील, ज्यात कधी नकळत तोंडात पैसे घालणे, तर कधी खाण्यायोग्य नसलेल्या गोष्टी आई-वडिलांच्या नकळत खाणे, अशा अनेक गोष्ट आहेत. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एका चिमुकलीचा पाय एका भांड्यात अडकताना दिसत आहे.

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
fog shocking accident video
कडाक्याची थंडी, दाट धुकं अन् भयंकर अपघात! एकमेकांवर आदळल्या अनेक गाड्या; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली खेळता-खेळता एका कढईच्या कडीमध्ये स्वतःचा पाय घालते. पण, तिचा पाय कडीमध्ये अडकतो. चिमुकली स्वतःचा पाय काढण्यासाठी अनेक प्रयत्न करते, परंतु तिचा पाय बाहेर निघत नाही. त्यानंतर ती मोठमोठ्याने रडू लागते. तिचं रडणं एकूण तिच्या घरचे कडीतून पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. शेवटी बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर चिमुकलीचा पाय बाहेर निघतो. या चिमुकलीची करामत पाहून तिचे बाबा तिला ओरडतात. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून अशा घटना अनेकदा गमतीशीर जरी वाटत असल्या तरी यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा: ‘जेव्हा मृत्यू आपल्यासमोर असतो..’ वाघाने हत्तीवर बसलेल्या व्यक्तीवर केला हल्ला; पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sayko.sh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि पंचवीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “मी लहान असताना माझं डोकं डब्यात अडकले होते”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “माझी मुलंही अशीच आहेत.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “वेडी मुलगी आहे”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “मी लहान असताना माझे डोके शाळेतील खिडकीत अडकले होते आणि सर्व विद्यार्थी निघून गेले होते.”

Story img Loader