आपल्या सर्वांना माहित आहे की कार अपघात, विशेषत: जेव्हा दोन कार आदळतात तेव्हा ते प्राणघातक ठरू शकतात. पण दोन गाड्यांची टक्कर एखाद्याचा जीव वाचवू शकते असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर? हा व्हिडीओ पाहिल्याशिवाय तुमचा विश्वास बसणार नाही. नेदरलँड्समध्ये एका व्यक्तीने आपल्या कारवरील नियंत्रण गमावलेल्या बेशुद्ध चालकाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या कारचे बलिदान दिले.

कार अपघातामुळे जीव वाचला

व्हिडीओमध्ये एक कार दिसत आहे, जी एका हायवेच्या शेजारी असलेल्या गवताच्या मैदानावर वेगाने जात असताना तिचे नियंत्रण सुटले आहे. गाडी रेलिंगला धडकली तरी चालतच राहते. व्हिडीओमध्ये आपण पाहतो की, अनियंत्रित कार थांबवण्यासाठी दुसरा कार चालक त्याच्यासमोर आपली कार चालवू लागतो, त्यानंतर कारची धडक बसते. मात्र, यादरम्यान अपघातामुळे कोणाचीही इजा होत नाही, उलट गाडी अनियंत्रित होऊन थांबते.

( हे ही वाचा: ‘हा’ आहे जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा, जो विकतोय आपली २३० कोटींची संपत्ती! )

( हे ही वाचा: Video: “मॅन ऑफ द मॅच आम्हा पटेलांमध्येच राहील असे दिसते!” – हर्षल पटेल )

कारच्या डॅशकॅममध्ये या घटनेची झाली नोंद

या दोन कारच्या मागे चालणाऱ्या कारच्या डॅशकॅममध्ये या घटनेची नोंद झाली आहे. ‘बेहोश झालेल्या दुसऱ्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी माणसाने आपल्या कारचा बळी दिला.” अशी व्हिडीओला कॅप्शन दिली आहे. हा व्हिडीओ ९.०६.३ हजार वेळा पाहिला गेला आहे. २०,००० हून अधिक वापरकर्त्यांनी ही पोस्ट लाईक केली आहे. हेन्री टेमरमन नावाच्या व्यक्तीला एक अनियंत्रित कार रस्त्यावरून जात असल्याचे लक्षात आल्याने शुक्रवारी दुपारी ननपीत येथे ही घटना घडली.