Viral Video:समाजमाध्यमांवर लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांना आपण रील्स बनवताना पाहतो. आजकालच्या लहान मुलांमध्ये सोशल मीडियाप्रती खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. आजपर्यंत डान्सचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक चिमुकली लावणीच्या तालावर ठेका धरताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहान मुलांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो, ज्यात ती बिनधास्त स्टेजवर डान्स करताना किंवा गाणं गाताना, अभिनय सादर करताना दिसतात. चिमुकल्यांच्या या व्हिडीओवर लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. आता व्हायरल होत असलेला चिमुकलीचा व्हिडीओ पाहून नेटकरी तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये लावणीच्या तालावर जबरदस्त ठेका धरताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा: प्राण्यांबरोबर चिमुकला करतोय जीवघेणे स्टंट; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lavanipremi या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला पाच लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, तीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूपच सुंदर डान्स’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘मराठी मुलगी’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एक नंबर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘जबरदस्त डान्स.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video the netizens were shocked to see the girls thumka sap