Ganpati dance Viral Video: आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे आणि बाप्पाला निरोप देण्याचा दिवस अनेकांना भावूक करतो. सध्या सोशल मीडियावर गणेशोत्सवादरम्यानचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात बाप्पाच्या आगमनाचे, मूर्तीचे, सजावटीचे विविध व्हिडीओ यांसह मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये भाविकांबरोबर करण्यात आलेली वाईट वागणूक सध्या खूप चर्चेत आहे. याचदरम्यान, आता बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांना हसू येत आहे.

बाप्पाला आपण नेहमीच आनंदाने निरोप देतो. त्यामुळे निरोपाच्या दिवशी अनेक जण विसर्जन मिरवणुकीत नाचण्यासाठी आतुर असतात. यावेळी अनेकांना नाचता नाचता आपण काय करतोय याचे भान नसते. सध्या एका व्यक्तीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये तो नाचता नाचता असं काहीतरी करतोय, जे पाहून अनेक जण हसताना दिसत आहेत; तर काही जण त्याच्या कृतीवर राग व्यक्त करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मिरवणुकीत नाचता नाचता बाजूने जाणाऱ्या पोलिसांची टिंगल करताना दिसत आहे. यावेळी ते पोलिस त्याला हाताने पुढे जाण्यास सांगतात. त्यानंतर तो पुन्हा त्यांच्याकडे बघून नाचू लागतो. त्यानंतर त्या व्यक्तीचे साथीदार त्याला पुढे घेऊन जातात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा: “शाळा असावी तर अशी…”, शिक्षकाने गायलं ‘बाप्पा मोरया रे’ गाणं अन् विद्यार्थ्यांनी दिली साथ; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “असे शिक्षक प्रत्येक शाळेत…”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sky_to_high_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत काही दशलक्षांमध्ये व्ह्युज आणि एक दशलक्षाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिलेय, “भावाची पोलिसांसोबत दुश्मनी आहे वाटतं.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “त्याच्याकडे डान्सचं लायसन आहे.” तर तिसऱ्या युजरने लिहिलेय, “पुढचा भागपण पाहायचा आहे.” तर, आणखी एका युजरने लिहिलेय, “याचा डान्स मला जास्त आवडला.”