काही वर्षे जुनी दिल्ली प्राणिसंग्रहालयाची दुर्घटना आज तेलंगणामध्ये घडू शकली असती, परंतु हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी शेवटच्या क्षणी पोहोचून आफ्रिकन सिंहाच्या अगदी जवळ आलेल्या व्यक्तीला वाचवले.

नक्की काय झालं?

खरं तर, मंगळवारी हैदराबादच्या नेहरू प्राणिसंग्रहालयात ३१ वर्षीय व्यक्ती आफ्रिकन सिंहाच्या अगदी जवळून चालत गेला, जरी त्याला प्राणीशास्त्र उद्यानाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच वाचवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात अशी घटना दोनदा घडली आहे. २०१४ मध्ये एकदा एका २० वर्षीय तरुणाला वाघाने निर्घृणपणे ठार मारले होते, तर दुसऱ्यांदा २०१९ मध्ये एका तरुणाला सिंहाच्या तावडीतून वाचवण्यात आले. २०१९ मध्ये प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी आलेल्या एका तरुणाने अचानक सिंहाच्या जवळ ८ फूट खाली उडी मारली. दरम्यान, तेथे उपस्थित लोकांनी आरडाओरडा केला तेव्हा सुरक्षा रक्षकांची नजर त्याच्यावर पडली, त्यानंतर तो बचावला.

( हे ही वाचा: …अन् लग्नाचा लेहेंगा घालूनचं वधू पोहचली परीक्षा केंद्रावर; व्हिडीओ व्हायरल )

( हे ही वाचा: Viral Video: ट्रेनमध्ये मिळाली नाही जागा म्हणून जुगाड करत चक्क बनवली स्वतःची सीट! )

२०१४ मध्ये घडलेली धक्कादायक घटना

२०१४ साली दिल्लीच्या प्राणीसंग्रहालयात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली होती जेव्हा एका २० वर्षांच्या तरुणाने पांढऱ्या वाघाच्या १८ फूट खोल खोलीत उडी मारली होती. सुमारे १५ मिनिटे मकसूद हा तरुण जिवंत राहिला. सुमारे १० मिनिटे तो हात जोडून वाघासमोर बसून वाचण्यासाठी विनंती करत होता. वाघाने त्याला चाटले, हलकेच चार-पाच वेळा चाटले आणि परतला. दरम्यान, चौकाबाहेर जमलेल्या जमावाने आरडाओरडा सुरू केला. वाघावर कुणीतरी दगडफेक केली. चिडलेला वाघ परत आला आणि त्याने तरुणाच्या गळ्यावर दाताने चावा घेतला. त्याने मकसूदच्या मानेवर दोनदा वार करून त्याची हत्या केली.