Viral Video: गणेशोत्सव सुरू होण्याचा उत्साह ते गणेशोत्सव संपण्याचे दुःख या सर्व भावनांमधून सध्या अनेक जण जात आहेत. बघता बघता गणोशोत्सव संपत आला. आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. समाजमाध्यमांवरही गणेशोत्सवासंबंधित अनेक व्हिडीओ सातत्याने चर्चेत असतात. त्यातील काही व्हिडीओंमुळे आपल्या चेहऱ्यावर हसू उमटते. दरम्यान, आता एका शाळेतील एक सुंदर व्हिडीओ समोर आला आहे.

आतापर्यंत आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांसोबत गणपती बाप्पाचे गाणे गाताना दिसत आहे. त्यांचा हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

Students Fight Video two students fight on coaching centre
छडी गेली आणि सोबत शिस्तही; विद्येच्या मंदिरात दोन विद्यार्थ्यांनी ओलांडली मर्यादा, VIDEO पाहून सांगा अशा मुलांचं करायचं काय?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Student told Hilarious Math Full Form funny Answer
MATHS चा फुल फॉर्म माहितेय? विद्यार्थ्याने दिले भन्नाट उत्तर, पाहा Viral Video
Zilla Parishad school Viral Video
“इथे शिक्षणावर प्रेम केलं जातं…” जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी नाचत नाचत गायलं पावसाचं गाणं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक
teacher, teacher latest news, Wardha,
‘तुमचे नुकसान भरून काढू, पण एक दिवस सुट्टी घेऊ द्या’, शिक्षक करताहेत विनंती
Teacher dances on thirsty crow song students followed it viral video on social media
“मॅडम तुम्ही…”, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकेने केला डान्स; VIDEO VIRAL होताच नेटकरी म्हणाले…
Kolhapur Viral Video students dance beat of Halgi
‘गावरान तडका…’ शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांनी धरला हलगीच्या तालावर ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरातील हलगी डान्स…”
himachal pradesh ragging video
Himachal Pradesh Ragging Video: दारू प्यायला नाही, म्हणून ज्युनिअर विद्यार्थ्याला सीनिअर्सकडून मारहाण; रात्रभर करत होते रॅगिंग!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ग्रामीण शाळेतील शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांसमोर ‘बाप्पा मोरया रे’ हे गाणे गात आहे. यावेळी शिक्षकाच्या मागे उभा असलेला एक विद्यार्थीदेखील त्या गाण्यावर अभिनय करीत गाणे गात आहेत. त्यानंतर पुढे सर्व जण हात वर करून मोठमोठ्याने ‘बाप्पा मोरया रे’ असे म्हणू लागतात. हा सुंदर व्हिडीओ पाहून नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘बाप्पा निघाले गावाला…’ बाप्पाचा निरोप घेताना चिमुकल्या झाल्या भावूक; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “खऱ्या भावना..”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adv.sushant_nagargoje4141 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करीत आहेत. त्यात एका युजरने लिहिलेय, “तुमच्यासारखे शिक्षक प्रत्येक शाळेत पाहिजे सर.” तर दुसऱ्या युजरने, “सुंदर आवाज आहे सर”, असे लिहिले आहे. तर, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “किती गोड! आणि तुमचा co-singer पाठीमागे, नजर हटतच नाही त्याच्यावरून… खरंच, बालपण निरागस असतं.” तर, आणखी एका युजरने लिहिलेय, “सर, मस्त वाटलं ऐकून. असे सर सर्व शाळांमध्ये पाहिजेत.”