scorecardresearch

VIRAL VIDEO : महिलेला वाटलं किचनमध्ये चोर घुसला, पण प्रत्यक्षात जे दिसलं ते पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल

महिलेला रात्री तिच्या स्वयंपाकघरातून काही आवाज ऐकू आला. तिला वाटलं की कदाचित तिच्या घरात चोर घुसला असेल. पण जेव्हा महिलेने प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पाहा हा व्हायरल व्हिडीओ….

snake-video
(Photo: Facebook/ Sunshine Coast Snake Catchers 24/7 )

एका ऑस्ट्रेलियन महिलेला रात्री तिच्या स्वयंपाकघरातून काही आवाज ऐकू आला. तिला वाटलं की कदाचित तिच्या घरात चोर घुसला असेल. पण जेव्हा महिलेने प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा तो चोर नसून भलामोठा साप होता. क्वीन्सलँडच्या सनशाइन कोस्ट भागातील ग्रामीण ग्लेनव्ह्यू येथे राहणाऱ्या एका महिलेला तिच्या स्वयंपाकघरातील काच फुटल्यासारखे काही आवाज ऐकू आले, घरात कोणीतरी काही काचेच्या वस्तू फोडल्याचा संशय आला. तिच्या घरात चोर आहे , असं वाटल्याने महिलेने स्थानिक पोलिसांना बोलावलं. मात्र, तिने स्वयंपाकघरात धाव घेतली तेव्हा तिला शेल्फभोवती एक मोठा अजगर दिसला.

त्यानंतर साप पकडणार्‍यांना पाचारण करण्यात आले आणि सनशाइन कोस्टमधील साप पकडणार्‍यांनी अजगराला वाचवण्याचा आणि त्याच्या स्थानांतराचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती गाडीच्या मागून काठी धरून किचनमध्ये अजगर उचलण्यासाठी जात आहे. “तो चोर आहे की पॅन्ट्रीमधला एक मोठा अजगर!” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. जेव्हा बचावकर्त्याने अजगराला वर स्वयंपाकघरात लपलेले पाहिले तेव्हा अजगर अगदी शांत बसला होता. त्याने अजगराला प्रेमाने पकडले आणि नंतर जंगलात सोडले. “काल रात्री तिथे खूप साप होते आणि त्यातले काही घरात घुसले होते,” असं देखील त्याने या पोस्टमध्ये सांगितलं.

आणखी वाचा : मालकीणीला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून मांजरीने काय शक्कल लढवली, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : OMG! मगरीने चक्क व्यक्तीच्या अंगावरच उडी घेतली, अंगावर काटा आणणारा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५५ हजारांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अलीकडेच, फिलीपिन्समधून एक प्रकरण समोर आले आहे. एक अजगर अनेक आठवड्यांपासून घराच्या छतावर राहत होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घरात राहणाऱ्या लोकांना त्याची कल्पनाही नव्हती. घराच्या गच्चीवर काम करायला लागल्यावर त्यांना हे चित्र दिसलं. तब्बल १५ फूट लांबीचा अजगर तिथे घर करून बसला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video the woman felt that there is a thief in her kitchen when she saw her senses flew away watch video prp

ताज्या बातम्या