Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. काही लोक त्यांना आलेले चांगले वाईट अनुभव शेअर करताना दिसतात. सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध आजी दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला ‘ही आज्जी तरुणपणी कशी दिसत असेल?’ असे विचारले आणि त्यानंतर चॅटजीपीटीनं या आज्जीचा तरुणपणीचा फोटो दाखवला..यावेळी हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आज्जी दिसेल. या आजीचे डोळे अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर आणि हाता पायावर सुरकुत्या पडल्यावर दिसत आहे. त्या सुरकुत्या पाहून तुम्हाला या आज्जीच्या वयाचा अंदाज येऊ शकतो. व्हिडीओत विचारलेय, ही आज्जी तरुणपणी कशी दिसत असेल? यावेळी चार्ट जीपीटी आजी तरुणपणी कशी दिसत असेल हा फोटो दाखवला. यावेळी तुम्हीही हा फोटो पाहून थक्क व्हाल. त्या फोटोमध्ये आज्जी खूप जास्त सुंदर दिसतेय. तिची सुंदरता पाहून तुम्ही आताच्या अभिनेत्रींना विसराल. सध्या हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

चॅट जीपीटी एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून काही लोक याला दुसरे Google देखील म्हणत आहे. तरुण आणि तांत्रिक क्षेत्रातील जाणकार आजकाल सोशल साईट्सवर यावर सतत चर्चा करताना दिसत आहे. हे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर लँग्वेज मॉडेल आहे. जे Open AI ने विकसित केले आहे, जे सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून घेऊन लेख, तक्ता, बातम्या, कविता, फोटो बनवून देणे अशा फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sadhana.dhumal.3 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दिवसागणिक कसा चेहरा बदलतो, शरीर थकतं, ताकत कमी होते.. अनुभवाची गाठोडी भरत जाते, अनेक गोष्टी हातातून निसटून जातात, काही, सोडून द्याव्या लागतात, काही नवीन गोष्टी तयार होतात, पण निसटून गेल्याचं काहीसं दुःख मनाच्या कोपऱ्यात राहून जातं, आणि त्याबरोबर जे आहे त्यांच्यासाठी विसरण्याचा प्रयत्न सुरू होतो…. जसं एक झाड उभं आहे त्याला नवीन पालवी येतं असते, तर जुनी पाने गळूनपडत असतात, पण ते झाड स्तब्ध उभं असतं, सगळं बघत असतं.. अनुभव घेत असतं… असो! किती बोलणार? “आनंदी रहा!” एवढं बोलून आपण पुढे जावं… सुखी रहा, आनंदी रहा…” तर एका युजरने लिहिलेय, “आजी तिच्या काळातली जयश्री गडकर” तर एका युजरने लिहिलेय, “किती भारी दिसत आहे आजी”