पाणीपुरी म्हटलं की प्रत्येकाच्या जिभेला पाणी सुटतं. आंबट-गोड-तिखट अशा वेगवेगळ्या चवींनी जिभेचे चोचले पुरवणारी पाणीपुरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना आवडते. पाणीपुरी म्हणजे इवल्या इवल्याश्या गोल आकाराची असंच चित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण तुम्ही कधी बाहुबली पानीपुरी कधी पाहिलीय का? होय. सध्या सोशल मीडियावर एका नव्या प्रकारच्या पाणीपुरीची चर्चा सुरूय. मध्यप्रदेशमधल्या नागपुरच्या या बाहुबली पाणीपुरीने सर्व खवय्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

लोकप्रिय फूड ब्लॉगर लक्ष दादवानी यांनी या जगावेगळ्या बाहुबली पाणीपुरीचा एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केलाय. मध्यप्रदेशमधल्या नागपुर इथल्या प्रताप नगर परिसरात ‘चिराग का चस्का’ नावाचं एक स्ट्रीट फूट स्टॉल आहे. या स्टॉलवर मिळणारी पाणीपुरी काहीशी हटके आहे. या स्टॉलवरील वेगवेगळ्या फ्लेवरमधील पाणीपुरी मध्यंतरी चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा आणखी एक हटके पाणीपुरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय ती म्हणजे ‘बाहुबली पाणीपुरी’.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
viral video of rainbow panipuri
हळदीच्या पुऱ्या, पालकाचे पाणी… पाहा ‘रेनबो पाणीपुरी’चा व्हायरल Video!; नेटकरी म्हणतात, “नको…”
Maha Metro, Nagpur, decrease, Metro fare, 33 percent, March 1 2024,
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

आता तुम्ही म्हणाल, ‘बाहुबली पाणीपुरी’ म्हणजे नेमकी कशी असते? बाहुबली सारखी दिसते का? तर होय. ही हटके पाणीपुरी बाहुबलीसारखीच मोठ्या आकाराची असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मोठ्या आकाराच्या पाणीपुरीमध्ये वेगवेगळ्या आंबड-गोड चटण्या आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सचं पाणी भरून पाणीपुरी प्रेमींना दिली जाते.

या बाहुबली पाणीपुरीमध्ये चिंचेची चटणी, एक हंगामी संत्र्याचं पाणी (उन्हाळ्यात आंब्याचा रस), जीरेचं पाणी आणि लसूणाचं पाणी असं एकत्रित मिश्रणाची अगदी युनिव्हर्सल चव, पण या व्यतिरिक्त हाजमोलाच्या चुर्णासारख्या चवीचं, किंवा जलजिराच्या चवीचंही पाणी अनेक ठिकाणी मिळतं. तसंच बटाट्याचं सारण जे साधारणपणे इतरही पाणीपुरीच्या आत भरलं जातं. हे सारण बाहुबली पाणीपुरीच्या वरच्या एका मोठ्या दंडगोलाकार भागावर ठेवण्यात येतं. या महाकाय बाहुबली पाणीपुरीला नंतर दही, बूंदी, शेव आणि डाळिंबाच्या दाण्यांनी सजवलं जातं..आणखी काय हवं डेझर्ट लव्हर्सना.. हे डेझर्ट फक्त याच स्टॉलवर मिळतं.

ही महाकाय बाहुबली पाणीपुरी पाहून तुमच्या तोंडाला पाणी तर सुटेलच. पण ती खाणं हे एक मोठं आव्हान आहे. आपण कोणत्याही स्टॉलवर पाणीपुरी खायला गेल्यानंतर अवघ्या एक दोन प्लेटमध्ये पोट भरून जातं. पण ही महाकाय पाणीपुरी पाहून तुमच्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता आहे. या इतक्या महाकाय पाणीपुरींमध्ये नेमके खास काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा युट्यूब व्हिडिओ नक्की पहा.

ही महाकाय ‘बाहुबली पाणीपुरी’ चाखताना तिचा प्रत्येक चाहता मोठा ‘आ’ वासून पुरी तोंडात घालताना नक्की विचार करेल. ज्या व्यक्तीनं हा पदार्थ शोधला ती व्यक्ती किती कल्पक असली पाहीजे नं. सोशल मीडियावरील पाणीप्रेमींमध्ये या हटके पाणीपुरीची चर्चा जोरात सुरूय. सोशल मीडियावर या महाकाय पाणीपुरीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत ३२ मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. त्याचप्रमाणे या व्हिडीओवर कमेंट्स करत पाणीप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत.