सध्या विविध प्रकारचे हेअर कट, केसांचा नवनवीन रंग (कलर) देण्यात येतात. आपण हटके कसे दिसू यावर तरुण मंडळींचे जास्त लक्ष असते. त्यामुळे ते स्वतःच्या केसांवर विविध प्रकारच्या गोष्टींचा प्रयोग करून पाहतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये सलूनमधील हेअरस्टालिस्टने कात्री एवजी आग लावून ग्राहकाचे केस सेट केले आहेत ; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओत सलूनमध्ये एक ग्राहक खुर्चीवर बसलेला दिसतो आहे. हेअर स्टायलिस्ट एका हातात फायर गॅस कॅन आणि दुसऱ्या हातात कंगवा धरून ग्राहकासमोर उभा आहे. यानंतर व्यक्ती ग्राहकाचे फायर गॅस कॅनचा उपयोग करून केस सेट करतो आहे. या साधनाचा उपयोग करता करता ग्राहकाच्या केसातून धूर निघतो आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. पाहा व्यक्तीची केस सेट करण्याची अनोखी पद्धत.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Pawan Hans released notification for Associate Helicopter Pilot posts Check Details Here
Pawan Hans Bharti 2024: पवन हंस अंतर्गत ‘या’ पदासाठी होणार भरती; चार लाखांपर्यंत मिळणार पगार, असा करा अर्ज
ed recruitment 2024 sarkari naukri officer job in ed full form needs qualification apply enforcement directorate gov in
ED Sarkari Job: ईडीमध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी! फक्त ही पात्रता आहे आवश्यक, मिळू शकतो १,५१,००० पर्यंत पगार

हेही वाचा…मानलं राव! गाड्या एकमेकांना धडकू नयेत म्हणून तरुणीचा हटके जुगाड; गाडीला लावली बाटली अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा :

व्यक्ती त्याच्या सलूनमध्ये आलेल्या ग्राहकांच्या केसांना आग लावून त्याचे केस सेट केले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल कात्रीच्या जागी व्यक्तीच्या हातात फायर गॅस कॅन आहे आणि त्याच्या मदतीने ग्राहकाच्या केसांना आग लावून केसांची हेअरस्टाईल करतो आहे . ग्राहकांच्या केसांवरून फायर गॅस कॅन फिरवतो आणि सगळ्यात शेवटी तो क्रीम लावतो आणि अशा अनोख्या प्रकारे ग्राहकाचे केस सेट करतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @PicturesFoIder या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण, हा एक फायर हेअरकट आहे. हेअरकट करण्याची ही नवीन पद्धत आहे. ज्यात कात्रीएवजी केसांना आग लावून केस सेट केले जातात. त्यामुळे हा ग्राहक सुद्धा खुर्चीवर शांत बसून हा अनोखा हेअरकट करून घेताना दिसत आहे. याआधी सुद्धा असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.