Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील रिल्स, फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात लग्नातल्या वरातीमध्ये नवरदेव हटके डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात अनेकदा वर आणि वधूदेखील इतरांप्रमाणे बेभान होऊन नाचताना दिसतात. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील एक नवरदेव असाच भान सोडून नाचताना दिसत आहे, ज्याला पाहून तुम्हीदेखील चकित व्हाल.

The young man showed cleverness to escape from the stray dogs
याला म्हणतात डोकं! भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तरुणानं लढवली शक्कल; VIDEO पाहून पोट धरून हसाल
groom friends danced to the song Gulabi Sari in marriage
‘गुलाबी साडी’ गाण्यावर भरलग्नात नवरदेवाच्या मित्रांनी केला डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “मित्र असावे तर असे”
why after marriage while living in family many things in nature of partner start to change
इतिश्री: लग्नानंतर घडतंय बिघडतंय कशामुळे?
Wedding Honeymoon Night Turned Nightmare
मधुचंद्राच्या रात्रीला भयंकर वळण! नवरीच्या ‘या’ आरोग्य स्थितीने नवऱ्याला बसला धक्का, डॉक्टरांकडून ऐका कहाणी व उपाय
Seeing the fast running cheetah the rabbit also ran fast
‘जेव्हा मृत्यू जवळ येतो…’, वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या चित्त्याला पाहून ससाही सुसाट धावला; पण पुढच्या पाच सेकंदात जे घडलं VIDEO पाहून उडेल थरकाप
Sambhaji Nagar Accident
“रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”
Husband and wife choked each other for a trivial reason
हद्दच झाली राव! क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीचा घराबाहेर राडा, एकमेकांना बेदम चोपलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांना आलं हसू
Boyfriend Stabs Girlfriend
“…तर आरती यादव वाचली असती”, पोलिसांवर आरोप करत पीडितेच्या आई-बहिणीने फोडला टाहो

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वधू आणि वर वरातीच्या गाडीमध्ये बसले असून त्यांच्या समोर नवरदेवाचे काही मित्र नाचताना दिसत आहेत. यावेळी अचानक नवरदेवाच्या आवडीचे गाणे सुरू होते, त्यावेळी तो जागेवरून उठून गळ्यातील वरमाला आणि पुष्पगुच्छ पत्नीकडे देऊन गाडीतून खाली उडी मारून मित्रांसोबत नाचायला जातो. नवरदेव नाचायला येताच मित्रदेखील त्याच्यासोबत बेभान होऊन नाचताना दिसतात. यावेळी तो नवरदेवदेखील बेभान होऊन नाचताना दिसत आहे. नवऱ्याचा डान्स पाहून युजर्स यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘जय श्रीराम’… माकडाने घेतली हनुमान मंदिरात एन्ट्री अन् स्वतःच्या गळ्यात घातला हार; Viral Video एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @uff_teri_adaa_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर एका युजरने कमेंट करून लिहिलंय की, “हा त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “बहुतेक हा याचा बेस्टफ्रेंड असेल.” तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “जेव्हा लग्नात नाचण्यासाठी मित्र बोलावतात, तेव्हा कोणालाच राहवत नाही.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “भावाला त्याच्या आवडीची बायको भेटली आहे.”