Little Girl Viral Dance: सध्या सोशल मीडियावर एक छोटीशी गोड मुलगी प्रचंड व्हायरल होत आहे. ही छोटी मुलगी आपल्या डान्सद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचं नाव आहे दिशू यादव आणि तिचे डान्स व्हिडीओज पाहून कोणीही म्हणेल, “ही मुलगी मोठ्या हिरोइन्सना टक्कर देईल”, सध्या तिचा एक नवा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. जिथे ती हरियाणवी गायक सुमित पार्ताचा “बस मंगलवार ना पीते” या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. तिच्या डान्समधले मूव्ह्ज, स्टेप्स आणि चेहऱ्यावरच्या भन्नाट एक्स्प्रेशन्स पाहून नेटकऱ्यांनी थेट “ही तर छोट्या वयातली सुपरस्टार आहे”, असा शिक्काच मारून टाकला आहे.
अगदी बॉलीवूड अभिनेत्रीला लाजवणारे एक्स्प्रेशन्स!
काहींना वाटेल, एवढीशी मुलगी काय डान्स करेल? पण दिशूच्या एकेका स्टेपमधून जो आत्मविश्वास आणि स्टाइल दिसते, ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि तालावरचं नियंत्रण पाहून बरेच युजर्स थक्क झालेत. या व्हिडीओमध्ये दिशूच्या डान्स स्टेप्स जितक्या खास आहेत, त्याहून अधिक प्रभावी आहेत ते तिचे एक्स्प्रेशन्स. गाण्यातील प्रत्येक शब्दावर ती जे चेहऱ्यावर हावभाव दाखवतेय, ते पाहून वाटतंय की, एखादी अनुभवी अभिनेत्री सेटवर अभिनय करत आहे. एका नेटकऱ्यानं तर लिहिलं, “ही तर मोठ्या हिरोइन्सनापण मागं टाकेल”
दिशूच्या यशामागे तिचे आई-वडीलसुद्धा तितकेच कारणीभूत आहेत, जे वेळोवेळी तिचे व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करीत राहतात. दिशूचा प्रत्येक डान्स हा केवळ एक परफॉर्मन्स नसून, तो एक अनुभव असतो. तिच्या डोळ्यांतील चमक, एक्स्प्रेशन्समधलं जिवंतपण आणि लयीत थिरकणं हे सगळं पाहून असं वाटतं की, ही मुलगी भविष्यात मोठं नाव कमावणार आहे.
जर तुम्ही अजून दिशू यादवचा व्हिडीओ पाहिला नसेल, तर एकदा नक्कीच बघा. कारण- ही छोटीशी मुलगी फक्त डान्स करत नाही, तर ती प्रत्येक बीटवर जादू उधळते. तिची निरागसता आणि धमाल एनर्जी पाहून कोणीही तिचा फॅन होईल.
येथे पाहा व्हिडीओ
नेटकऱ्यांची पसंती, कमेंट्सचा पाऊस
या व्हिडीओला आतापर्यंत ६५ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये लोक तिचं प्रेमानं भरभरून कौतुक करीत आहेत. “किती गोड आहे ही”, “रियल सुपरस्टार”, अशा कमेंट्सनी दिशूचं मनोबल आणखी वाढलं आहे. विशेष म्हणजे, याआधीही तिचा एक व्हिडीओ १२ कोटींपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला होता.