सध्या अशा काही गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्या आजच्या काळात आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतात. आजही अशी माणसे खरोखरच आहेत का, जे आपले काम इतक्या तळमळीने करतात, याचा विचार करायला आपण भाग पडतो. सध्याही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या छोट्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर अनेक लहान दगड विखुरलेले दिसत आहेत. अशा स्थितीत तेथून जाणाऱ्या नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून वाहतूक पोलिस हे दगड बाजूला करत आहेत.

वाहतूक पोलिसाच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सगळेच लोक इतके जबाबदार नसतात, या अधिकाऱ्याला सलाम. ट्रॅफिक पोलिस कर्मचारी या खड्यांकडे आणि तिथून जाणाऱ्या लोकांच्या त्रासाकडे अगदी सहज दुर्लक्ष करू शकत होता, पण त्याने आपले काम चोखपणे केले.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

omgshazz या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. कमेंट सेक्शन स्क्रोल केल्यावर तुम्हाला प्रत्येकाच्या मनात या अधिकाऱ्याबद्दल वाढलेल्या आदराची कल्पना येईल. या व्हिडीओने अनेकांना आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करायला प्रेरित केले असेल.