सेल्फीची क्रेझ तरुणांमध्ये इतकी आहे की ते कुठेही सेल्फी घेण्याची संधी सोडत नाहीत. लग्न असो वा पार्टी, तरुणाई नेहमीच सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असते. असे असले तरी कधी-कधी सेल्फीची क्रेझ महागात पडते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात सेल्फी काढण्याची आवड एका मुलीला भारी पडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की काय झालं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी कालव्याच्या काठावर उभी राहून सेल्फी घेताना दिसत आहे. ती वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान ती सेल्फी घेण्यात इतकी व्यस्त होते की तिचे नियंत्रण सुटते आणि ती कालव्यात पडते. कालव्यात पडलेल्या मुलीचा व्हिडीओ पाहून तुमचे हसू आवरत नाही.

( हे ही वाचा: पाठवणीच्या वेळी ‘गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल’ गाण्यावर नवरीने केला जोरदार डान्स; बघा Viral Video )

इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक मुलगी हातात फोन घेऊन कालव्याच्या काठावर उभी आहे. ती तिच्या फोनवरून वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून असे दिसते की तिने अनेक फोटो क्लिक केले आहेत, तरीही ती वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी काढत आहे.

( हे ही वाचा: वयाच्या ६८ वर्षी जोडप्याला परस्थितीने काम करण्यास भाग पाडले, प्रामाणिकपणा आणि मेहनत पाहून नेटीझन्सही झाले भावूक )

( हे ही वाचा: दुसऱ्या लग्नासाठी मिरवणूक घेऊन नवरदेव पोहोचला मुलीच्या घरी, पहिली बायको समोर उभी दिसली, मग.. )

उडी मारताना होतो अपघात

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा ती सेल्फी घेत आहे, तेव्हा ती पुन्हा पुन्हा उडी मारत आहे आणि तिच्या चेहऱ्याचे भाव बदलत आहे. यादरम्यान मुलीच्या पायाचे संतुलन बिघडले आणि ती थेट कालव्यात जाऊन पडते. यानंतर तिच्या चेहऱ्याचे संपूर्ण भाव बदलतात. पडल्यानंतर मुलगी खूप अस्वस्थ झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. कालव्यात पडल्यानंतर सहाजिकच तिचा मोबाईल आणि ड्रेस पूर्णपणे भिजला. यानंतर ती पटकन कालव्यातून बाहेर येते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video this young lady was taking selfie while standing on the bank of canal and then ttg
First published on: 10-12-2021 at 10:52 IST