Viral Video: जगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान, प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चित्ता एका कोल्ह्याची शिकार करण्यासाठी जंगलात वाऱ्याच्या वेगाने धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, एक चित्ता कोल्ह्याची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करतो. यावेळी तो कोल्ह्यावर झडप घालणारच इतक्यात मागून दुसरा बिबट्या धावत येतो आणि कोल्ह्याचा पाठलाग करतो. त्यानंतर तिसरा बिबट्या तिथे येतो आणि तिघं मिळून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, पण कोल्हा तिघांच्या तावडीतून सटकतो.

हेही वाचा: ‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X (ट्विटर) वरील @wildanimalearth98 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये, “तीन चित्त्यांच्यामध्ये अडकलेला कोल्हा” असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर बारा हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “मला वाटतंय ते खेळत आहेत”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “पुढे काय झालं त्याचं? “, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “हा व्हिडीओ पाहून माझ्या अंगावर काटा आला.”

Story img Loader