Viral Video: जंगलातील जीवन वरून जितकं सुंदर आणि शांत वाटतं, तितकंच ते संघर्षमय असतं. प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते आणि त्यामुळे अनेक प्राणी शिकार करून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडताना दिसतात. शिकारीचा पाठलाग, शिकार पकडण्यासाठी केलेली धावपळ आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा संघर्ष हा जंगलातील जीवनचक्राचा महत्त्वाचा भाग आहे. सोशल मीडियावर असे व्हिडीओ समोर आल्यावर जंगलातील प्राण्यांच्या जगण्याची ही कठीण बाजूही पाहायला मिळते.
सोशल मीडियावर सध्या जंगल आणि निसर्गरम्य ठिकाणांमधील व्हिडीओंना मोठी पसंती मिळताना दिसते. हिरवाईने नटलेला परिसर, उंच झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि जंगलातील शांत वातावरण कॅमेऱ्यात कैद करून अनेकजण हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशा व्हिडीओंमधून निसर्गाचं मनमोहक सौंदर्य पाहायला मिळत असल्याने ते नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात आणि अनेकदा मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात.
जंगलातील काही लहान प्राणी दिसायला जरी छोटे असले, तरी जगण्यासाठी तेही आक्रमक आणि क्रूर होऊ शकतात. शिकार मिळवणे, स्वतःचे संरक्षण करणे आणि भक्षकांपासून बचाव करण्यासाठी हे प्राणी गरज पडल्यास धाडसीपणे हल्ला करतात. जंगलातील प्रत्येक जीवासाठी जगण्याची लढाई महत्त्वाची असल्याने आकारापेक्षा परिस्थितीनुसार त्यांची ताकद आणि आक्रमकता अधिक दिसून येते.
जंगलात शिकारीसाठी नेहमीच मोठ्या प्राण्यांची गरज नसते; कळपाने केलेला हल्ला किती भयंकर ठरू शकतो, याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जंगली कुत्र्यांच्या कळपाने एका म्हशीवर हल्ला केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जंगली कुत्रे एकत्र येत म्हशीला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. जंगलातील अन्नसाखळी आणि जगण्यासाठीची ही धडपड पाहून अंगावर काटा येतो.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ युट्यूबवरील @AnimalsaroundtheWorld या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “कळपाने शिकार केली यशस्वी झाली” एका युजरने लिहिलेय, “बिचारी म्हैस” आणखी एका युजरने लिहिलेय, “जंगली कुत्रे खूप क्रूर आहेत.”
