Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असतात. कारण यामध्ये कधी दोन शत्रू प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात, तर अनेकदा दोन मित्र प्राणी एकमेकांवर हल्ला करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर जंगलातील दृश्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ आपल्यासाठी केवळ एक थरारक घटना दाखविणारा क्षण असला तरीही तो शिकार करणाऱ्या आणि शिकार झालेल्या प्राण्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी घटना असते. खरे तर माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर, इतर प्राणी प्रत्येक दिवस जगताना मरणाची भीती बाळगून जगतात.

समाजमाध्यमांवर सतत प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे; ज्यात एका वाघ प्राण्याची शिकार करण्याआधी शक्कल लढवताना दिसतोय.

ज्याप्रमाणे मनुष्य अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी आयुष्यभर कष्ट करतो, त्याचप्रमाणे निसर्ग नियमानुसार प्रत्येक जीव आयुष्यभर आपली भूक भागवण्याच्या शोधात असतो. अनेकदा जंगलातील प्राणी करत असलेली शिकार पाहून लोक त्यांच्या हिंसक वृत्तीवर चर्चा करतात, पण शेवटी त्यांनादेखील जगण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करणे गरजेचे असते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये शिकारीच्या शोधात असणाऱ्या वाघाला एक डुक्कर दिसते. बेसावध डुक्कर निवांत झोपले होते, यावेळी वाघ चोरपावलांनी अंदाज घेऊन अचानक डुक्करच्या दिशेने धावतो. बेसावध डुक्कर खडबडून सावध होते व दूर पळण्याचा प्रयत्न करते. परंतु चपळ वाघ डुक्करावर हल्ला करण्यात यशस्वी होतो.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @Animalsrecapped या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “वाघाने करून दाखवलं” दुसऱ्याने लिहिलेय, “बिचारे डुक्कर” तिसऱ्याने लिहिलेय, “वाघासाठी डिनर तयार झाला”