scorecardresearch

घोडीवरून उतरून वरातीत पोहोचला नवरदेव, मग असा जबरदस्त डान्स केला…पाहा VIRAL VIDEO

लग्न म्हटलं की डान्स आलाच. पण कधी कधी हौशी नवरदेव असतात त्यांना वऱ्हाडी मंडळींचा डान्स पाहून त्यांना सुद्धा डान्स करण्याचा मोह आवरता येत नाही. अशाच एका हौशी नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Groom-Dance-Video-Viral
(Photo: Instagram/ psycho_biharii)

लग्नाचे वेगवेगळे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. कधी नवरी-नवरदेव यांच्यातील मजेदार आणि रोमँटिक स्टाइल तर कधी वऱ्हाडी मंडळींचा नागिन डान्सला बराच चर्चेत येत असतो. असं असलं तरी भारतीय लग्नसोहळ्यात डान्स नसेल तर सगळंच अपूर्ण वाटतं. लग्न म्हटलं की डान्स आलाच. पण कधी कधी हौशी नवरदेव असतात त्यांना वऱ्हाडी मंडळींचा डान्स पाहून त्यांना सुद्धा डान्स करण्याचा मोह आवरता येत नाही. अशाच एका हौशी नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नवरदेव घोडीवरून खाली उतरतो आणि थेट वऱ्हाडी मंडळींसोबत डान्स करू लागतो. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नवरदेव आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह त्याच्याच लग्नाच्या वरात घेऊन नवरीच्या घराकडे जात आहे. तेव्हाच डीजेवर सर्वजण थिरकू लागतात. मित्रांच्या विनंतीवरून नवरदेवही घोडीवरून खाली उतरतो आणि त्याचं आवडतं गाणे ‘बंदि कमरिया पे सारी’ वाजू लागतं.. मग आवडत गाणं म्हटल्यावर डान्स करण्याचा मोह कुणाला आवरतो? अशीच अवस्था या नवरदेवाची झाली. आवडतं गाणं ऐकल्यावर नवरदेव सुद्धा त्याच्या मित्रांसोबत अशा जबरदस्त डान्स स्टेप्स करू लागतो की तिथे उपस्थित असलेले सारेच जण आश्चर्यचकित होतात.

आणखी वाचा : OMG! उकळत्या तेलात हात घालून तळतोय भजे; विश्वास बसत नाही तर पाहा VIRAL VIDEO

स्वत:च्या लग्नात नवरदेवाने संपूर्ण वरातीचं वातावरण बदलून टाकलं. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओमधल्या नवरदेवाचा डान्स लोकांना खूपच आवडू लागलाय. हा व्हिडीओ psycho_biharii नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ खूप कमी वेळेत इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर पाच हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video today dulhe ka dance google trends trending video groom did explosive dance with baarati everyone impressed after seeing prp