Mother & Son Shocking accident viral video: रस्त्यावरचा एक छोटासा क्षण आयुष्यभराची वेदना देऊन जातो.रोजसारखा वाटणारा प्रवास कधी अडथळा आणेल हे कुणालाच सांगता येत नाही. एका क्षणात सगळं काही बदलून जातं, हसतं-खेळतं आयुष्य अचानक शांत होतं. असा एक प्रसंग अलीकडेच समोर आला असून, तो पाहून कुणाचंही मन सुन्न होईल आणि डोळ्यांत नकळत पाणी येईल.

एक अंगावर काटा आणणारी घटना तेलंगणामधून समोर आली आहे. आईसोबत स्कुटीवरून प्रवास करत असलेल्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे, तर अनेकजण रस्ते सुरक्षेवर आणि प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तेलंगणातील आर. के. पुरम फ्लायओव्हर परिसरातील आहे. नेरेडमेट पोलिस ठाण्याच्या ठिकाणी हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या लहान मुलाला घेऊन स्कुटीवरून जाताना दिसते. अचानक स्कुटीचा ताबा सुटतो आणि वाहन रस्त्यावर घसरते. त्याच वेळी मागून एक मोठा ट्रक त्या मार्गावरून जात असतो.

व्हिडीओत दिसते की स्कुटी अचानक घसरते आणि आई व मुलगा रस्त्यावर पडतात. पडण्याच्या काही सेकंदांतच मागून येणारा ट्रक त्या चिमुकल्याच्या अंगावरून जातो. हा प्रसंग इतका पटकन घडतो की काही समजायच्या आतच सगळं संपलेलं असतं. सहा वर्षांचा तो निष्पाप मुलगा जागीच प्राण सोडतो. दरम्यान, त्याची आई गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेली दिसते. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे . व्हिडीओ पाहताच लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत अनेक युजर्सनी हा प्रसंग पाहून धक्का बसल्याचे सांगितले. एका युजरने लिहिले, “त्या लहानग्याचा मृत्यू प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहावा लागतोय, हे खूप वेदनादायक आहे.”

दुसऱ्या युजरने नमूद केले, “हेल्मेट घातले असते तर कदाचित मुलाचा जीव वाचला असता.” काही लोकांनी वाहनचालकांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी या अपघातामागे खराब रस्ते आणि पायाभूत सुविधा कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. एका युजरने लिहिले, “रस्त्यावर खड्डे आणि तडे आहेत, अशा ठिकाणी वाहन चालवणं अवघड होतं.