Viral Video : Tricolor hoisted in deep sea; Seeing the performance of the Indian Coast Guard will fill you with pride | Loksatta

Viral Video : खोल समुद्रात फडकावला तिरंगा; भारतीय तटरक्षक दलाची कामगिरी पाहून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल

१५ ऑगस्ट रोजी भारत ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या निमित्ताने भारतीय तटरक्षक दलाने खोल समुद्रात उतरून तिरंगा फडकवला आहे.

Viral Video : खोल समुद्रात फडकावला तिरंगा; भारतीय तटरक्षक दलाची कामगिरी पाहून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल
येत्या १५ ऑगस्टला आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. (Photo : Twitter/@IndiaCoastGuard)

येत्या १५ ऑगस्टला आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. याच निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय सरकारकडून देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या स्मरणार्थ केंद्रातील मोदी सरकारने अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची तयारी जोमात सुरु आहे. हे अभियान १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान असून या मोहिमेअंतर्गत सरकार देशातील २० कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांचंच लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये भारतीय तटरक्षक दल अनोख्या पद्धतीने तिरंगा फडकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही अभिमान वाटेल. ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचा एक भाग म्हणून भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात तिरंगा फडकवल्याचे डेमो केले आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बाटलीतलं पाणी खाली पडण्याऐवजी हवेतच झालं गायब; हा Viral Video पाहिल्यावर तुमचाही डोळ्यावर विश्वास बसणार नाही

१५ ऑगस्ट रोजी भारत ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या निमित्ताने भारतीय तटरक्षक दलाने खोल समुद्रात उतरून तिरंगा फडकवला आहे. भारतीय तटरक्षक दलाने आपल्या ट्विटर हँडलवरून समुद्रात तिरंगा फडकवतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत अनेक वेळा पाहिला गेला आहे. अनेक युजर्स या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2022 at 12:09 IST
Next Story
‘मी पेन्सिल मागितली तर आई मला मारते’: लहान मुलीची पीएम मोदींकडे महागड्या पेन्सिल, मॅगीबाबत तक्रार