Viral Video : सोशल मीडियावर गाडीच्या मागे लिहिलेल्या मेसेजचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी हे मेसेज वाचून पोट धरून हसायला येते तर कधी हे मेसेज थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओमध्ये एका ट्रकच्या मागे लिहिलेला मेसेज दिसत आहे. हा मेसेज वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ट्रकवर नेमका कोणता मेसेज लिहिला आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (Viral Video Truck Driver’s Hilarious Message on Truck Pati)

ट्रक चालकाचा भन्नाट मेसेज

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक ट्रक दिसेल. या ट्रकच्या मागे एका मोठ्या पाटीवर भलामोठा मेसेज लिहिला आहे. हा मेसेज पाहून तु्म्हीही थक्क व्हाल. या पाटीवर लिहिलेय, “इतनी ही जल्दी है तो फिर हवाई जहाज मे सवारी कर बार बार हॉर्न बजाकर दिमाग मत खराब कर” ( मराठी : एवढीच घाई असेल तर विमानातून प्रवास कर वारंवार हॉर्न वाजून डोकं खराब करू नको) ट्रक वर दिसत असलेल्या नंबर प्लेटवरून हा ट्रक मध्यप्रदेश येथील इंदोर येथील असल्याचे दिसून येत आहे.

Police scolded truck driver for writing shayari on truck viral video on social media
तू एवढा देखणा आहेस? ट्रकवर लिहलेली शायरी पाहून रस्त्यातच अडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा पोलिसांनी नेमकं काय केलं
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल
Gas tanker blast on a Road
अशा वेळी चार हात नाही तर चार किमी दूर रहा! भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट; थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
Shocking video Boy sitting at a bus stop was hit by a bus video goes viral
बस स्टॉपवर बसलेल्या तरुणावर ड्रायव्हारने घातली बस; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप; VIDEO पाहताना सावधान
viral video of desi jugaad
पायऱ्यांवरून सामान उतरवण्याचं टेन्शन दूर; ‘त्यानं’ शोधला असा जुगाड की… VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Puneri pati at petrol pump funny message goes viral on social media
PHOTO: पुणेकरांचा नाद करायचा नाय! पेट्रोल पंपावर लिहली खतरनाक पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही म्हणाल “जशास तसं”
Truck driver hid the truck number plate by applying grease on it, policeman reprimanded him video goes viral
दंड बसू नये म्हणून ट्रक मालकानं शोधला खतरनाक जुगाड; पठ्ठ्याची नंबर प्लेट पाहून व्हाल थक्क, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : VIRAL VIDEO : ‘आनंद पोटात माझ्या मावेना…!’ बाबांनी वाढदिवसाला दिलं असं हटके गिफ्ट की… लेक आनंदाने मारू लागला उड्या

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

kem_cho_rajkotiyans या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “काहीही म्हणा, भावाने एकनंबर लिहिलेय.” तर एका युजरने लिहिलेय, “मध्यप्रदेशातील लोक असेच असतात सर्वांचे डोकं खराब करतात.” आणखी एका युजरने लिहिलेय, “इंदोरवाले काहीही करू शकतात.” एक युजर लिहितो, “१०० टक्के खरं आहे.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनने भाताऐवजी खाल्ला Cauli Rice? काय आहे हा cauli rice? तुम्ही खाऊ शकता? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

यापूर्वी ही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी नागपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये एका कारच्या मागच्या काचेवर वडीलांवर आधारित मेसेज लिहिला होता. त्या काचेवर लिहिले होते, “नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील” हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या खूप पसंतीस उतरला होता.

Story img Loader