Viral Video: खरं प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते, त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. पण, प्रेमात भांडणं, वादविवादही बऱ्याचदा पाहायला मिळतात. असं म्हणतात, जिथे जास्त प्रेम असतं तिथेच जास्त भांडणंदेखील होतात. मात्र, हल्ली भांडणातील निर्मळ आणि नि:स्वार्थी प्रेम फार क्वचित पाहायला मिळतं. कारण- अलीकडच्या नात्यांमध्ये भांडणं व्हायला लागली की, लोक लगेच ते नातं तोडून टाकण्याची घाई करतात. पण पूर्वी होणारी भांडणं कितीही मोठी असली तरीही त्यात नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्याची ओढ होती.

हल्लीचा बदलणारा काळ बघता प्रेम, लग्नं फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे ते दोघं एकमेकांना आयुष्यात कितपत साथ देतील हे सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर वृद्ध जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये त्यांचे प्रेम पाहून आपल्यालाही हेवा वाटतो. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका घरातील आजी-आजोबांचे भांडण पाहायला मिळत आहे, जे पाहून युजर्सही अनेक कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Trigrahi Yog 2024
Trigrahi Yog 2024 : ५० वर्षानंतर कन्या राशीमध्ये बनतोय त्रिग्रही योग, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
friendship, unspoken bond, lifelong connection, love and labels, emotional journey, mutual respect, supportive relationship, life decisions
माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’
how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद
husband is younger than the wife chatura article
स्त्री आरोग्य: पती पत्नीपेक्षा वयाने लहान असेल तर?
woman have to fight against atrocities marathi news
आता तूच भेद या अन्यायाच्या भिंती…

नक्की काय घडलं व्हिडीओमोध्ये? (Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घरातील आजी-आजोबा कोणत्या तरी कारणावरून एकमेकांशी भांडण करताना दिसत आहेत. यावेळी ते दोघेही एकमेकांकडे बघून आपला राग व्यक्त करीत आहेत. सुरुवातीला ते कमी आवाजात एकमेकांशी भांडतात आणि त्यानंतर दोघांचाही आवाज चढतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: किली पॉलचा ‘इश्क विश्क प्यार व्यार’ गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @prabhattt.06_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास चार दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दीड लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “आजी-आजोबा असतात पानात वाढलेल्या लोणच्यासारखी… थोडीच लाभणारी; पण सगळ्या जेवणाची गोडी वाढवणारी.” दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “ही शेवटची पिढी आहे यार… यानंतर अशी माणसं नाही दिसणार ना असा स्वभाव.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ खूप आवडला. कारण- दोघांनी भांडणामध्ये एकमेकांना एकही वाईट शब्द आणि शिवी उच्चारली नाही. यातच आजी आणि आजोबांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते दिसून येतंय”