Viral video turkey icecream vendor pranked by women with leopard speed Watch Funny Clips | Loksatta

Video: आईस्क्रीम विक्रेता खेळ करायला गेला, महिलेने झटक्यात उलट फिरवली चाल, चित्त्याच्या वेगाने आली अन..

Viral Video: लोकांना छळणाऱ्या आईस्क्रीम विक्रेत्याला महिलेने आपल्याच खेळात हरवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुर्की आईस्क्रीम विक्रेत्यासमोर महिलेने असं नेमकं काय केलं चला पाहुयात..

Video: आईस्क्रीम विक्रेता खेळ करायला गेला, महिलेने झटक्यात उलट फिरवली चाल, चित्त्याच्या वेगाने आली अन..
Viral video turkey icecream vendor pranked by women with leopard speed Watch Funny Clips

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तुर्की आईस्क्रीम विक्रेत्यांच्या ट्रिक आपण अनेकदा पाहिल्या असतील. काही वेळा तर त्यांचा हा खेळ पाहून चिडलेल्या ग्राहकांचा संतापही आपण पाहिला असेल. ग्राहकाच्या हातात आईस्क्रीम देतानाच अचानक कोन फिरवून केले जाणारे खेळ पाहताना गंमत वाटते खरी पण एका पॉइंटला आपण आईस्क्रीम कसं पकडू शकत नाही हे पाहून चिडचिड होते. यावेळेस मात्र जरा हटकेच व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोकांना छळणाऱ्या आईस्क्रीम विक्रेत्याला महिलेने आपल्याच खेळात हरवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुर्की आईस्क्रीम विक्रेत्यासमोर महिलेने असं नेमकं काय केलं चला पाहुयात..

व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की तुर्की आईस्क्रीम विक्रेता महिलेसोबत नेहमीप्रमाणे खेळताना दिसत आहे. पण शेवटी ती स्त्री आहे, आणि स्त्री काहीही करू शकते! तुर्की आईस्क्रीम विक्रेत्याचा खेळ पाहून तिने आधी समोर धरलेल्या पाठीवरून आईस्क्रीमचा एक स्कुप काढला आणि मग नंतर एक कोन उचलला एकीकडे तो विक्रेता आपल्या खेळात गुंतला असताना महिलेने चक्क स्वतःला वेगळंच आईस्क्रीम बनवून घेतला. महिलेचा वेग व हुशारी पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

Video: रावण दहनात आला भन्नाट ट्विस्ट; रामलीला सुरु असताना रावणाने बंदूक काढली अन…

हा व्हिडिओ @moistnlover आणि @theloversayings यांनी Instagram वर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेच्या मुलीने आईचा हा भन्नाट व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओला १ कोटी ९ लाखाहून अधिक व्ह्यूज आणि २१ लाख लाईक्स आहेत. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करून हेच बघायची माझी इच्छा होती असं म्हंटलं आहे तर काहींनी याला म्हणतात जशास तसे असे म्हणत महिलेचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘व्हेन पॉप्स इज द बॉस’! पायलट बाप-लेकाची जोडी एकत्र उड्डाण करतानाचा VIDEO VIRAL

संबंधित बातम्या

बापरे! बाळाने खेळणं समजून किंग कोब्राची मान धरली, काही सेकंदातच असं घडलं…; Video होतोय Viral
Video: बहिणीच्या लग्नाला निघालेल्या भावावर काळाचा घाला; हृदय पिळवटून टाकणारा अपघात कॅमेऱ्यात कैद
Video: जर इच्छा असेल तर माझ्या बेडवर..उर्फी जावेद अतिउत्साहात बोलून गेली आणि मग जे झालं…
Video: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”
Video: बहिणीच्या नवऱ्यासोबत मेहुणीने केलेल्या डान्सची नेटकऱ्यांना भूरळ; म्हणाले, ‘आमची नजरच हटेना…’

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “वाह रे पठ्ठ्या…”
‘हा’ लोकप्रिय भारतीय अभिनेता एलॉन मस्कच्या सहाय्याने घेणार अंतराळात झेप
सुपरमार्केटमध्ये खिडक्या का नसतात? यामागचे कारण जाणून तुम्हीही व्हाल चकित
“आता तुम्ही दिलेलं मत कुठे जाणार आणि कुठून कुठून जाणार, हे तुम्हाला तरी कळतं का?” – उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला!
मिलिंद सोमण विकतोय खास पुरुषांसाठी भांडी घासायचा साबण; व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले