Viral Video: आजच्या धावपळीच्या जीवनात महिला आपले करिअर, घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतानाही स्वतःच्या आवडी-निवडींसाठी वेळ काढताना दिसतात. अनेक महिलांना डान्सची विशेष आवड असते. दिवसभराच्या कामातून थोडा वेळ काढून त्या डान्सचा सराव करतात किंवा सोशल मीडियावर आपले डान्स व्हिडीओ शेअर करतात. डान्समुळे त्यांना केवळ आनंदच मिळत नाही, तर ताणतणाव कमी होऊन आत्मविश्वासही वाढण्यास मदत होते. त्यामुळे जबाबदाऱ्या सांभाळतानाच स्वतःच्या छंदाला वेळ देणाऱ्या महिलांची ही सकारात्मक झलक सोशल मीडियावरही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नुकतीच नारळी पौर्णिमा पार पडली असून या सणाच्या निमित्ताने सोशल मीडियावर कोळी संस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त अनेकांनी पारंपरिक कोळी वेशभूषा, कोळी गाणी आणि नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. यातील कोळी गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडूनही या व्हिडीओंना मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

‘वेसावची पारू’ हे लोकप्रिय कोळी गाणं आजही तितकंच चर्चेत आहे. पारंपरिक कोळी संस्कृतीची झलक आणि ठेका धरायला लावणारे संगीत यामुळे हे गाणं अनेकांच्या आवडीचं ठरतं. विशेष म्हणजे सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांपासून ते सोशल मीडियावरील रिल्सपर्यंत या गाण्यावर अनेक जण डान्स करताना दिसतात. त्यामुळे जुनं असलं तरी ‘वेसावची पारू’ची क्रेझ आजही कायम असल्याचं पाहायला मिळतं.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन काकू पारंपरिक कोळी वेशभूषा करून ‘वेसावची पारू’ या कोळी गाण्यावर उत्साहात डान्स करताना दिसत आहेत. दोघींच्या नृत्यातील उत्साह आणि पारंपरिक अंदाजाने हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने कोळी संस्कृतीची सुंदर झलक या डान्समधून पाहायला मिळत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांकडूनही भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Soulethestudio (@soulethestudio)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @soulethestudio या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर डान्स” एका युजरने लिहिलेय, “काय सुंदर डान्स केला दोघींनी” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी”